पनवेल येथील व्यावसायिक गाळे खरेदीत घोटाळा
पनवेल येथील व्यावसायिक गाळे खरेदीत घोटाळा
पीएमसी बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
मुंबई, ता. ११ : पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या (पीएमसी बँक) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, मुख्य व्यवस्थापकांसह पनवेल येथील शुभम कमर्शियल इंटरप्रायझेस प्रा. लि. कंपनी आणि या कंपनीच्या तीन संचालकांविरोधात भांडुप पोलिसांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
नवी शाखा सुरू करण्यासाठी २०१८साली बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि मुख्य व्यवस्थापक कमलजीत कौर यांनी शुभम कमर्शियल इंटरप्रायझेस कंपनीला नियमबाह्य पद्धतीने १४. ५ कोटी रुपये दोन टप्प्यांत अदा केले. प्रत्यक्षात हा व्यवहार घडला तेव्हा या कंपनीने हाती घेतलेले इमारत बांधकाम पूर्ण व्हायचे होते. ठरावीक मुदतीत ही जागा बँकेच्या ताब्यात आली नाही तसेच कंपनीने घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे बँकेला १४.५ कोटींचे नुकसान झाले. २०१९मध्ये कोट्यवधींचा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर पीएमसी बँकेचा ताबा युनिटी स्मॉल फायनान्स बँककडे देण्यात आला. या बँकेने कारभार हाती घेतल्यावर पनवेल येथील व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदीसंदर्भातील कागदपत्रे सापडली. नव्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा अद्याप ही इमारत अपूर्ण आणि बंद अवस्थेत असल्याचे आढळले. या व्यवहाराची अंतर्गत चौकशी केली असता हा व्यवहार रिझर्व्ह बँकेला अंधारात ठेवून नियमबाह्य पद्धतीने केल्याचे उघड झाले. हा व्यवहार शुभम कंपनीला फायदा व्हावा, म्हणून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने दिलेल्या तक्रारीआधारे गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

