‘एआय’ आधारित टोल नाका सुरू करा
‘एआय’आधारित टोलनाका सुरू करा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणावर उपाय म्हणून दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, ‘दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. यामुळे प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो.’ दरम्यान, हा टोलनाका स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी टोलनाक्याच्या स्थलांतरनाला विरोध केला आहे. त्यांची बाजूदेखील रास्त असून त्यांच्या भूमिकेचा विचार करून टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्याचा टोलनाका कायमस्वरूपी बंद करणे शक्य होईल. या बैठकीत पेणकर फाटा, सिग्नल येथील वाहतूक सुलभता आणि दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोलनाका या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश
मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले, ‘टोलवसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी. वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करणाऱ्या एआय कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित टोल भरणा होईल. यामुळे टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगा भूतकाळात जातील. तसेच दोन टोलनाक्यांचा भरणा एकाच ठिकाणी करण्याची संकल्पना अमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

