राजकीय अस्तित्वासाठी धडपड

राजकीय अस्तित्वासाठी धडपड

Published on

राजकीय अस्तित्वासाठी धडपड
माजी नगरसेवक नवीन प्रभांगाच्या शोधात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी पूर्ण झाली आहे. सोडतीमध्ये दिग्गज माजी नगरसेवकांच्या पारंपरिक जागा आरक्षणात गेल्याने नवीन प्रभागांच्या शोधात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेने आरक्षणाचा मसुदा १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे. नागरिकांना २० नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आपल्या हरकती आणि सूचना संबंधित प्रभाग कार्यालयात सादर करता येतील. सर्व हरकतींचा विचार करून २८ नोव्हेंबर रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांचे गणित कोलमडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांचा दादर (१८२) प्रभाग ओबीसी वर्गासाठी राखीव झाला आहे, तर भाजप नेते रवी राजा यांचा सायन (१७६) प्रभागदेखील ओबीसी कोट्यात गेला आहे. काँग्रेसचे जावेद जुनेजा, माजी नगरसेवक सफीयान बानो, भाजपचे नील सोमैया (मुलुंड) यांच्या प्रभागाला आरक्षणाचा फटका बसला आहे.
----------------------------------
राखीव प्रभागांची शोधाशोध
माजी नगरसेवकांनी नवीन प्रभाग शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. काहीजण पारंपरिक भागाजवळील खुले प्रभाग तपासत आहेत, तर काहीजण पक्षात लॉबिंग करून शेजारच्या क्षेत्रातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही माजी नगरसेवक पत्नी, सून, मुलीला राखीव प्रभागातून उमेदवारी देऊन घराण्याचा राजकीय प्रभाव कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत.
--------------------------------
पक्षश्रेष्ठींची कसरत
राजकीय विश्लेषकांच्या मते, अंतिम आरक्षण यादी २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर नव्या प्रभागातून नवी वाटचाल सुरू होईल. मुंबईतील स्थानिक राजकारणातील जुनी समीकरणे मोडून नवे गठबंधन आणि नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र माजी नगरसेवकांचे पुनर्वसन करायची जबाबदारी पक्षश्रेष्ठींच्या असून, आता हा चेंडू त्यांच्या कोर्टात असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
..........
माझा प्रभाग ओबीसी आरक्षित झाला असून, आसपासच्या प्रभागांमध्येदेखील आरक्षण आहे. आता सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. महापालिकेवर युतीचा झेंडा फडकावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
-रवी राजा, भाजप
...........
हरकती नोंदवायचा पर्याय आहे, मात्र त्याचा फार काही उपयोग होईल, असे वाटत नाही. यामुळे वास्तव स्वीकारून नवीन प्रभागमध्ये नवीन महिलांना संधी देण्याचा विचार सुरू आहे.
-मंगेश सातमकर, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com