दक्षिण मुंबईतील ६२६ वृद्धांमध्ये ‘सायबर’ जागृती

दक्षिण मुंबईतील ६२६ वृद्धांमध्ये ‘सायबर’ जागृती

Published on

दक्षिण मुंबईतील ६२६ वृद्धांमध्ये ‘सायबर’ जागृती

पोलिसांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिली गुन्ह्यांबद्दल माहिती


मुंबई, ता. १५ : आभासी अटकेसह अन्य सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी दक्षिण मुंबईतील तब्बल ६२७ एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत शनिवारी (ता. १५) माहिती दिली.

परिमंडळ ९ अर्थात वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी या भागात एकाकी राहणाऱ्या ८०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात, कोणती प्रलोभने दाखवली जातात, कोणत्या निमित्ताने भीती घातली जाते, अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून भीती किंवा प्रलोभन दाखवल्यास काय करावे, याबाबत यापूर्वी माहिती देण्यात आली होती. त्याच धर्तीवर शनिवारी दक्षिण मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना सतर्क करण्यात आले. यामध्ये पोलिसांसह कोणतीही शासकीय संस्था डिजिटल किंवा आभासी अटक करत नाही, कायद्यात डिजिटल अटक अशी कोणतीही तरतूद नाही, अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका, अशा कॉलनुसार कधीही पैसे पाठवू नका, कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या वागण्यात बदल दिसल्यास त्याकडे लक्ष द्या, आभासी अटकेचे बळी ठरला असाल, तर त्वरित आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातेवाइकांना माहिती द्या, आभासी अटकेबाबत कोणताही कॉल आला, तर लगेच जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा. मदतीसाठी १९३०,१०० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा, असे आवाहन करण्यात आले.

१० महिन्यांत ११४ कोटींची लूट
- यावर्षी ऑक्टोबरपर्यंत शहरात आभासी अटकेचे एकूण १४२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात तब्बल ११४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com