सुप्रिया लाइफ सायन्सच्या उत्पन्नात २० टक्के वाढ
‘सुप्रिया लाइफ’च्या उत्पन्नात २० टक्के वाढ
मुंबई, ता. १७ : औषध रसायन निर्मिती क्षेत्रातील कंपनी सुप्रिया लाइफ सायन्सेसच्या उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा २०.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
त्यांना जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत १९९.८३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत हे उत्पन्न १६६.१० कोटी रुपये होते. त्यांना या तिमाहीत ५० कोटी ४३ लाख रुपये करोत्ततर नफा मिळाला. मागील वर्षी याच तिमाहीत त्यांचा नफा ४६ कोटी १५ लाख रुपये होता. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात त्यांना ॲनास्थेटिक विभागामुळे ५४ टक्के उत्पन्न मिळाले. व्हिटामिन विभागाचा उत्पन्न वाटाही पहिल्या सहामाहीत १२ टक्के एवढा वाढला आहे.
या तिमाहीत युरोपीय बाजारपेठेने कंपनीच्या उत्पन्नातील ३७ टक्के वाटा दिला. आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील देशांचा वाटाही अनुक्रमे ३४ आणि २१ टक्के झाला. भविष्यातील वाढीला सहाय्य करण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेतल्याचे सुप्रिया लाइफ सायन्सेसचे कार्यकारी अध्यक्ष सतीश वाघ म्हणाले. यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत आम्हाला आणखी जास्त वाढ मिळेल, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली.

