मुंबईची विजेची मागणी गारठली
मुंबईची विजेची मागणी गारठली
एसी, पंख्याचा वेग मंदावला; तीन हजार मेगावॉटची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : चार दिवसांपासून मुंबईत जाणवत असलेल्या गारव्यामुळे विजेची मागणी पुरती गारठली आहे. एरवी ३,५०० हजार मेगावॉटच्या घरात विजेची मागणी नोंदली जाते, पण गारव्यामुळे एसी, पंखे, कूलरचा वेग मंदावला आहे. त्याचा थेट परिणाम मुंबईच्या विजेच्या मागणीवर दिसत असून, सकाळी केवळ ३,०४६ मेगावॉट एवढी मागणी होती.
मुंबई शहर आणि उपनगरांत सुमारे ५० लाख वीजग्राहक असून, त्यांना बेस्ट, अदाणी इलेक्ट्रिसीटी आणि टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जातो. यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस लांबल्याने ऑक्टोबर हिटच्या काळातही विजेची मागणी ३,५०० हजार मेगावॉटच्या खाली होती, मात्र आता तापमानाचा पारा ३१ अंशापर्यंत खाली आला असून, वातावरणात गारवा आहे. त्यामुळे आज (ता. १७) सकाळी मुंबईची विजेची मागणी ३,०४६ मेगावॉट एवढी होती, तर शनिवारी आणि रविवारी २,९०० मेगावॉट एवढी मागणी होती. वातावरणात गारवा असल्याने विजेची मागणी कमी झाली आहे.
राज्यातही मागणी कमी
मुंबईबरोबरच राज्यभरातून महावितरणकडे नोंदली जाणारी विजेची मागणी १८-१९ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली आहे. त्यामुळेच आज मुंबईसह संपूर्ण राज्याची विजेची मागणी केवळ २१ हजार ६२४ मेगावॉट एवढी आहे.
ऑक्टोबर हिट नाहीच!
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवतात, मात्र ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाचे वातावरण असल्याने नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, असे चित्र होते, मात्र घटलेली विजेची मागणी पाहता ऑक्टोबर हिट नसल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

