घाटकोपरमध्ये पाच विद्यार्थ्यांना अन्नबाधा

घाटकोपरमध्ये पाच विद्यार्थ्यांना अन्नबाधा

Published on

घाटकोपरमध्ये पाच विद्यार्थ्यांना अन्नबाधा

शाळेतील उपाहारगृहातील समाेसे खाल्ल्याने त्रास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : घाटकोपर पश्‍चिमेतील साईनाथनगर रोडवरील के. व्ही. के. शाळेच्या उपाहारगृहातील समोसे खाल्ल्याने मंगळवारी (ता. १७) दुपारी २.१५च्या सुमारास पाच विद्यार्थ्यांना अन्नबाधा झाली. त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास हाेऊ लागल्याने तत्काळ राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. तीन जणांना उपचारांनंतर घरी साेडण्यात आले. दाेन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

राजावाडी रुग्णालयातील एएमओ डॉ. अजित यांच्या माहितीनुसार, इक्रा जफर मियां सय्यद (वय ११) आणि वैशा गुलाम हुसेन (१०) यांच्यावर बाह्यरुग्ण विभागाच्या माध्यमातून उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजिक खान (११), आरुष खान (११) आणि अफझल शेख (११) यांना प्राथमिक उपचारांनंतर घरी साेडण्यात आले.
विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले, तेव्‍हा त्यांना मळमळीचा त्रास होता. उपचारांनंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, काहींना घरी साेडण्यात आले. शाळेतील सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती रुग्णालयाला दिली. विषबाधेच्या नेमक्या कारणाबाबत तपास सुरू असून, शाळा व्यवस्थापनाकडे सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती रुग्णालय अधीक्षक डॉ. भारती राजुलवाला यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हे उपाहारगृह तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा व्यवस्थापनाने सर्व पालकांना परिस्थितीबाबत माहिती देऊन तपास पूर्ण होईपर्यंत उपाहागृहातील खाद्यपदार्थ न देण्याचे आश्वासन दिले आहे.
--------------------------------------
अन्नपदार्थांचे नमुने तपासणार
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ शाळेच्या उपाहारगृहाला भेट देऊन अन्नपदार्थांचे नमुने घेतले. हे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येणार असून, स्वच्छता व साठवणुकीची स्थिती तपासणे, उपाहारगृहाच्या परवानग्या व कागदपत्रांची पडताळणी याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीत अन्नपदार्थ निकृष्‍ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाल्यास उपाहारगृहाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com