सीएनजी पंपावर  वाहनांच्या रांगा

सीएनजी पंपावर  वाहनांच्या रांगा

Published on

सीएनजी पंपावर  वाहनांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई/घाटकोपर, (बातमीदार) ता. १८ : महानगर गॅसच्या पाइपलाइनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील हजारो वाहनचालकांना सलग दोन दिवस बसला. सीएनजी पुरवठा पूर्ण ठप्प झाल्याने मुंबई परिसरातील तब्बल १६४ सीएनजी पंप बंद होते. परिणामी कॅब, टॅक्सी आणि रिक्षासेवा ठप्प झाली. परिणामी प्रवाशांचेही हाल झाले.

मुंबईसह उपनगरातील सर्वच सीएनजी पंपावर मंगळवारी (ता. १८) पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र पुरवठा सुरळीत न झाल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे दिवसभरात रस्त्यावरील टॅक्सी व रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आणि शहरातील वाहतुकीचा वेगही मंदावला. प्रतीक्षा नगर, वडाळा येथे महागनर गॅसचा सीएनजी पंपावर मोठी गर्दी झाली आहे. बीकेसी  परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात रिक्षा, ॲप आधारित खासगी टॅक्सींचा भरणा होता. या वाहनांच्या रांगेमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. गॅस नसल्याने आम्हाला गाडी काढता आला नाही. त्यामुळे धंद्यावर परिणाम झाल्याचे विवेक साळवे  या रिक्षाचालकाने सांगितले. मी मागील दोन तासांपासून रांगेत आहे, असेही त्याने सांगितले. गॅस असल्याशिवाय मी गाडी काढू शकत नाही, असे एझाज अन्सारी या खासगी ॲप आधारिक टॅक्सीचालकाने सांगितले.  दुसरीकडे गॅस नसल्याने त्याचा मोठा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडला. एकीकडे प्रवाशांची संख्या वाढली तर दुसरी बेस्ट डेपोमध्ये सीएनजीसाठी टॅक्सीच्या रांगा लागल्या होत्या.


रिक्षात शनिवारी भरलेले गॅसवरच दिवस काढतोय. वडाळा डेपोला जाणे शक्य नाही, खूप गर्दी आहे. आज दोन लिटर पेट्रोल भरून दोन-तीन फेऱ्या मारल्या, पण काहीच हाताशी आले नाही. हप्ता, घरखर्च, मुलांचे शिक्षण हे सर्व रिक्षावर अंवलबून आहे. आजची कमाई शून्य झाली.
- रुपेश थोरात, रिक्षाचालक

दोन दिवस काहीच कमाई नाही. रोज साधारण हजार रुपये मिळतात; पण आज तर काहीच मिळाली. सकाळी सात वाजता वडाळा येथे गॅस भरण्यासाठी गेलो; दुपारी १ वाजता नंबर लागला. अर्धा दिवस तिथेच गेला.
- मंगेश भालेराव, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com