मंगलप्रभात लोढा यांना अस्लम शेख यांची धमकी
मंगलप्रभात लोढा यांना अस्लम शेख यांची धमकी
पोलिस आयुक्तांकडे केली तक्रार
मुंबई, ता. २१ ः रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशी यांना विरोध करणारे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिल्याबाबत लोढा यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
लोढा यांनी अस्लम शेख यांच्या मतदारसंघात मालवणीत वास्तव्याला असलेले हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. ‘याबाबत पाठपुरावा करीत असल्यानेच त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली आहे,’ असे लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेख यांच्या व्हिडिओची लिंकही त्यांनी सोबत दिली आहे. प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात नऊ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमणमुक्त केला आहे. यासंदर्भात लोढा म्हणाले, की ‘एकीकडे मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असताना आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालून ते मुंबईच्या सुरक्षेला धोका पोहोचवीत आहेत, हे आम्ही खपवून घेणार नाही. स्थानिक आमदार हे सातत्याने समाजविघातक शक्तींना अभय देत आहेत. तसेच घुसखोर बांगलादेशींच्या अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात ते सातत्याने अडथळा निर्माण करीत आहेत.’ आमदार अस्लम शेखसारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करीत राहणार असल्याचेही लोढा यांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

