मंजूर ठिकाणीच झोपडपट्टी सुधार मंडळाची विकासकामे

मंजूर ठिकाणीच झोपडपट्टी सुधार मंडळाची विकासकामे

Published on

मंजूर ठिकाणीच झोपडपट्टी सुधार मंडळाची विकासकामे
कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी म्हाडाचे निर्देश; निधीचा अपव्यय, वेळ वाचणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून मुंबई शहर आणि उपनगरातील झोपडपट्टीत विविध विकासकामे केली जातात. ही कामे यापुढे जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर केलेल्या ठिकाणीच केली जाणार आहेत. त्यामुळे निधीचा अपव्यय टळणार असून, वेळही वाचणार आहे. तसेच मंजूर जागेऐवजी आमदार-खासदारांच्या मागणीनुसार इतर ठिकाणी काम केल्यास येणाऱ्या कायदेशीर अडचणीही कमी होणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आमदार-खासदारांनी सुचवलेली कामे झोपडपट्टी सुधार मंडळाकडून केली जातात. ही कामे कुठे करण्यात येणार आहेत, याबाबत आधीच मंजुरी मिळाली असतानाही अनेकदा आमदार-खासदार सदरच्या कामाचे ठिकाण बदलण्यासाठी दबाव आणतात. त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होत असून, वेळ आणि निधीचा अपव्यय होतो. आयत्यावेळी ठिकाण बदलल्याने ज्या ठिकाणी काम मंजूर केले आहे, तेथे ते प्रत्यक्षात नसतेच. त्यामुळे म्हाडाला टीकेचा धनी व्हावे लागते. त्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या ठिकाणीच यापुढे कामे करावीत म्हणून म्हाडाने आपल्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी काम करायचे नसेल, तर ते रद्द करावे लागणार आहे. त्याचबरोबर सदरचे काम दुसऱ्या ठिकाणी करावयाचे असेल, तर त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करून मंजुरी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदार-खासदारांचा झोपडपट्टी सुधार मंडळाच्या विकासकामातील हस्तक्षेप कमी होणार असल्याचे म्हाडाच्यडा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आचारसंहितेमुळे लगबग
मुंबईत महापालिका निवडणुका कोणत्याही वेळी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यास नवीन कामे मंजूर करणे, उद्‍घाटन करण्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे सध्या झोपडपट्टीतील सुधार मंडळाच्या कामाला मंजुरी मिळावी, कामाला सुरुवात व्हावी म्हणून संबंधित लोकप्रतिनिधीची जिल्हाधिकारी कार्यालय आणि झोपडपट्टी सुधार मंडळाच्या कार्यालयात लोकप्रतिनिधीची वर्दळ वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com