महापरिनिर्वाण दिनानिमित्त रस्ते वाहतुकीत बदल

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रस्ते वाहतुकीत बदल

Published on

महापरिनिर्वाणदिनानिमित्त रस्ते वाहतुकीत बदल
उद्यापासून दादर परिसरात गर्दीमुळे परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अनुयायी ४ डिसेंबरपासून चैत्यभूमी, दादर परिसरात येणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे चैत्यभूमी व आसपासच्या परिसरातील रस्त्यांच्या वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता शुक्रवार (ता. ५) ते रविवारपर्यंत (ता. ७) वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत चैत्यभूमी, शिवाजी पार्क दादर परिसरातील वाहतुकीवर गर्दीमुळे परिणाम होणार आहे.

अ) एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते
१) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा श्री. सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा रुग्‍णालयापर्यंत वाहतुकीकरिता बंद राहील. तथापी हिंदुजा रुग्‍णालय येथील स्थानिक नागरिक हे एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेऊन पांडुरंग नाईक मार्गे राजा बढे चौक येथे जाऊ शकतील.
२) एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी श्री. सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग राहील. म्हणजेच या मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोतृगीज चर्च जंक्शन येथून श्री. सिद्धिविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.
३) रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, एम. बी. राऊत मार्ग हा वाहतुकीकरिता बंद राहील.
४) टी. एच. कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा रुग्‍णालय जंक्शन ते आसावरी जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद राहील.

अवजड वाहनांना खालील मार्गावर प्रतिबंध
अ) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन
ब) एल. जे. रोडच्या माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन
क) गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाका
ड) सेनापती बापट मार्गाच्या माहीम रेल्वेस्थानक ते वडाचा नाका
इ) दादर टी. टी. सर्कल ते टिळक पुलावर, वीर कोतवाल गार्डन ते संपूर्ण एन. सी. केळकर रोड

ब) वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग
१) दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्गे माहीम एल. जे. रोड अथवा सेनापती बापट मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वेस्थानक किंवा ६० फूट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घेऊ शकतात अथवा वांद्रे-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे (सी. लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.
२) उत्तर वाहिनी कुलाबाकडून बी. ए. रोडने अथवा हाजी अली मार्गे ॲनी बेझेंट रोडने उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा पुलाखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पिटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे अथवा वरळी-वांद्रे सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे. महालक्ष्मी रेल्वेस्थानक जंक्शनकडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी डॉ. ई. मोझेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.
३) पूर्व द्रुतगती महामार्गे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक या वाहनांनी वडाळा पुलाचा वापर करून बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी, पूर्व मुक्त द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com