दादर परिसरात येथे वाहने उभी करणे टाळा
दादर परिसरात येथे वाहने उभी करणे टाळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रस्ते वाहतुकीत बदल केले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी नो पार्किंग झोन केले आहेत.
नो पार्किंग झोनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, रानडे रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर, एम. बी. राऊत रोड, पांडुरंग नाईक मार्ग, एन. सी. केळकर रोड, डॉ. वसंतराव जे. राथ मार्ग हा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते अमेगो रुग्णालयापर्यंत एस. एच. पळरकर मार्ग हा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते मिलेनियम इमारतीपर्यंतचा समावेश आहे.
डी. एस. बाबरेकर मार्ग हा सूर्यवंशी हॉल जंक्शन ते व्हिजन क्रेस्ट इमारतीपर्यंत, कीर्ती महाविद्यालय लेन मार्ग हा कीर्ती महाविद्यालय सिग्नल ते मीरामार सोसायटीपर्यंत, काशिनाथ धुरू रोड हा काशिनाथ धुरू जंक्शन ते आगर बाजार सर्कलपर्यंत, जे. रोड हा शोभा रुग्णालय ते गडकरी जंक्शनपर्यंत, कटारिया मार्ग हा गंगाविहार जंक्शन, शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत, राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदू कॉलनी रोड नं. १ ते रोड नं. ५ पर्यंत नो पार्किंग असणार आहे. तसेच लखमशी नप्पु रोड हा शुभम हॉटेल ते रुईया महाविद्यालय, दडकर मैदानापर्यंत, खारेघाट रोड नं. ५ ते पाटकर गुरुजी चौक, लेडी जहांगीर रोड हा रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते रॉन्ट जोसेफ शाळेपर्यंत, आर. ए. किडवाई रोड हा अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शन, नाथालाल पारेख मार्ग हा सेंट जोसेफ शाळा ते खालसा महाविद्यालय, स्वामी ग्यान जीवनदास मार्ग स्वामी नारायण मंदिर ते प्रीतम हॉटेल येथेही वाहने उभी करता येणार नाहीत.
वाहने उभी करण्यास उपलब्ध रस्ते
सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, इंडिया बुल्स १ सेंटर, कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कम्पाउंड, लोढा-कमला मिल कम्पाउंड, पाच गार्डन, एडनवाला रोड, नाथालाल पारेख मार्ग, आर. ए. के. ४ रोड, वडाळा
भोजन वाहन व्यवस्था
शिवाजी पार्क पोलिस ठाणे यांच्याकडून देण्यात आलेले पास घेऊन येणारी वाहने ही राजा बढे चौकातून ट्राफिमा हॉटेलसमोर, एम. बी. राऊत मार्ग येथे थांबतील.
१) ट्राफिमा हॉटेलसमोर, एम. बी. राऊत गार्ग, २) पांडुरंग नाईक मार्ग, पिंगे चौक, सारस्वत बँकेसमोर, ३) एस. एच. परळकर मार्ग, सीता निवास, विष्णू निवारा, लक्ष्मी निवास समोर, ४) एल. जे. रोड आणि पद्माबाई ठक्कर मार्गाच्या पदपथावर केली आहे. भोजन वाटप झाल्यानंतर वाहने एम. बी. राऊत मार्गावरून दिलीप गुप्तेमार्गे एस बॅक सिग्नल किंवा राजा बढे चौकाकडे बाहेर पडतील.
टॅक्सी स्टँड बंद
दादर स्टेशन (पूर्व) नायगाव पोलिस हॉस्पिटल, भोईवाडा दादर स्टेशन (पूर्व), एल. एन. आर ६४ ते वडाळा रेल्वेस्थानक
दादर स्टेशन (पूर्व) वडाळा उद्योग भवन, वडाळा उद्योग भवन ते दादर स्थानक (पूर्व)
दादर रेल्वेस्थानक (पूर्व) दादासाहेब फाळके मार्ग ते केईएम रुग्णालय, परेल
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

