धूळ, राडारोडा, कचरा हटवला!

धूळ, राडारोडा, कचरा हटवला!

Published on

धूळ, राडारोडा, कचरा हटवला!
मुंबईत पालिकेची तिहेरी स्वच्छता मोहीम यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई शहर व उपनगरे वायुप्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महापालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ५७० मेट्रिक टन कचरा, ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ टन राडारोड्याचे निर्मूलन करण्यात आले, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची एकूण १,८८८ किलोमीटर लांबीच्या ६७६ रस्त्यांची सखोल स्वच्छता केली.
या मोहिमेसह महापालिकेकडून सुरू केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सातत्याने सुधारणा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ आयोजित करण्यात आली होती. घनकचरा विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षकांना नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी किमान तीन प्रमुख रस्ते किंवा मार्ग दत्तक घेण्याचा उपक्रम पालिकेकडून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाशी सांगड घालत कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून २८ ते ३० नोव्हेंबर, अशी तीन दिवस विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

१४,१३८ स्वच्छता कर्मचारी सहभागी
या अंतर्गत रस्त्याच्या पृष्ठभागाची संपूर्ण स्वच्छता करणे, रस्त्यावर पडलेले टाकाऊ पदार्थ, बांधकाम राडारोडा आदींचे निर्मूलन करणे, दुभाजक, पदपथ व सेवा रस्ते स्वच्छ करणे आदी कार्यवाही करण्यात आली. महापालिकेच्या प्रशासकीय विभागात कार्यरत २२० कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून ६७६ रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यासाठी १४ हजार १३८ स्वच्छता कर्मचारी दोन हजार ६३ यंत्रसामग्रीसह कार्यरत होते. रस्ते धुण्यासाठी १६३ पाण्याचे टँकर, फवारणीसाठी ११९ मिस्टिंग संयंत्राचा वापर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com