क्षयरोगाच्या सुप्तावस्थेतील जीवाणूंना अँटिबायोटिक्सना निष्प्रभ करणारे ''सुरक्षा कवच''

क्षयरोगाच्या  सुप्तावस्थेतील जीवाणूंना अँटिबायोटिक्सना निष्प्रभ करणारे ''सुरक्षा कवच''
Published on

क्षयरोगांची औषधे होणार प्रभावी
जीवाणूंबाबत आयआयटी मुंबईचे महत्त्वाचे संशोधन
मुंबई, ता. ३ : क्षयरोगाचे सुप्तावस्थेतील जीवाणू अँटिबायोटिक्स घेऊनही कसे तग धरून राहतात, याबाबत आयआयटी मुंबईतील संशोधकांनी क्षयरोग जीवाणूंना अँटिबायोटिक्सपासून वाचवणारे ‘सुरक्षा कवच’ शोधून काढले. त्यामुळे आणखी नवे अँटिबायोटिक्स विकसित करण्याऐवजी, सध्याच्याच औषधांना अधिक प्रभावी करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
आयआयटी मुंबईच्या प्रो. शोभना कपूर आणि मोनॅश विद्यापीठाच्या प्राध्यापिका मेरी-इसाबेल ॲग्विलार यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच ‘केमिकल सायन्स’ नियतकालिकात प्रकाशित झाले. टीबीचे जीवाणू सक्रिय अवस्थेतून सुप्त अवस्थेत जाताना त्यांच्या पेशी पटलाच्या संरचनेत मोठे बदल होतात. सुप्त जीवाणूंचे पटल अधिक घट्ट बनते. त्यामुळे रिफाब्युटिनसारखी अँटिबायोटिक्स औषधे पेशी पटलातून आत प्रवेश करू शकत नाहीत. हे पटल औषधांसाठी ‘पहिला आणि सर्वात मजबूत अडथळा’ ठरतो, जे जीवाणूंचे ‘सुरक्षा कवच’ म्हणून काम करते, असे संशोधकांनी स्पष्ट केले. सध्याची अँटिबायोटिक्स औषधे बाह्य पटल शिथिल करू शकणाऱ्या रेणूंसोबत दिल्यास ती अधिक परिणामकारक ठरतील. हे पेप्टाइड्स पटलाला किंचित भेद्य बनवतील, ज्यामुळे अँटिबायोटिक्स आत प्रवेश करू शकतील आणि जीवाणू प्रतिकारशक्ती विकसित करण्यापूर्वीच नष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.
----------------------
उपचाराचा कालावधी होणार कमी
जीवाणूंच्या तग धरून राहण्याच्या यंत्रणेत हस्तक्षेप करता आल्यास, टीबीवरील सध्याची औषधे अधिक प्रभावी ठरू शकतील. यामुळे टीबीच्या उपचारांचा दीर्घकाळ चालणारा कालावधी कमी होण्यास आणि रोगाचे उच्चाटन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत मिळणार आहे. या नवीन अभ्यासाच्या आधारावर लवकरच टीबीच्या उपचार पद्धतींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------
जगभरात १२ लाख मृत्यू
२०२३ या वर्षात जगभरात सुमारे एक कोटी आठ लाख लोक टीबीने ग्रासले, तर याच काळात केवळ टीबीच्या आजाराने १२ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला, तर देशात २०२४ मध्ये सुमारे २६ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असल्याचेही विविध अहवालातून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com