कर्करोग सेवा होणार सर्वसमावेशक

कर्करोग सेवा होणार सर्वसमावेशक

Published on

कर्करोग सेवा होणार सर्वसमावेशक
जिल्हास्तरावर उपचार सुविधा मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः कर्करोगाचे वाढते प्रमाण व उपचाराचे गांभीर्य विचारात घेता, राज्यातील जनतेस सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर उपचार सुविधा मिळणार असल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार आणि ‘आसाम कॅन्सर केअर मॉडेल’च्या धर्तीवर राज्यात जिल्हास्तरीय त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा एल१, एल२ आणि एल३ सेवा उपलब्ध होणार आहे. एल१मध्ये शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रुग्णालय, तर एल२, एल३ स्तरावरील रुग्णालयात कर्करोगासंबंधित प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करणे, तसेच संशोधनकार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चित केले आहे. जिल्हा स्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा वेळ वाचणार आहे आणि स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एल २ स्तरावरील जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी संपूर्ण कर्करोग शिक्षण व सेवा उपलब्ध केली जाईल. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे. जे. रुग्णालय), कोल्हापूर, पुणे (बी. जी. मेडिकल महाविद्यालय), नांदेड, नाशिक आणि अमरावती येथील रुग्णालयांचा समावेश आहे. एल ३ मध्ये कर्करोग निदान आणि डे-केअर रेडिओथेरिपी व किमोथेरपी युनिट्स असणार आहेत. त्यात अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा रुग्णालय), सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे आणि शिर्डी येथील रुग्णालयांचा समावेश आहे. एल २ आणि एल ३मध्ये एकूण १८ रुग्णालये कार्यरत असतील. एल ३ स्तरावरील कर्करोग रुग्णालयांचे बांधकाम राज्य सरकारमार्फत करून ही रुग्णालये सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारण्यात येतील; मात्र त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण असेल.
----
महाकेअर फाउंडेशनची स्थापना
एल २ व एल ३ स्तरावर आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करणे, रुग्णालयांचे व्यवस्थापन करणे, पीपीपी धोरण राबविणे आदींसाठी कंपनी कायद्यांतर्गत महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फांउडेशन (महाकेअर फांउडेशन) ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com