महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष बससेवा
महापरिनिर्वाणदिनासाठी विशेष बससेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमाने यंदा विस्तृत तयारी केली आहे. ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी अतिरिक्त बससेवा, तात्पुरता वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
चैत्यभूमी परिसरातील मंडप व तंबूंना तात्पुरता वीजपुरवठा निवासी दराने देण्यात येईल. यासाठी ४ डिसेंबरपर्यंत जी/उत्तर विभागीय कार्यालयात अर्ज करता येईल. नाना-नानी पार्कजवळ तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी एक खिडकी योजना उभारण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी राखीव पथके आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर परिसर तसेच राजगृह आणि इतर ठिकाणी ७८१ एलईडी मार्गप्रकाश दिवे व अतिरिक्त मेटल हलाईड दिवे बसविण्यात येणार आहेत. प्रमुख ठिकाणी शोधप्रकाश दिव्यांचीही व्यवस्था केली आहे.
बससेवा
४ डिसेंबर रात्री १० पासून ते ६ डिसेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत ए४, ए २०२, ए २४१, ए ३५१, ए ३५४ आणि ए ३८५ या मार्गांवर १७ विशेष बसगाड्या चालवण्यात येतील. तसेच ६ डिसेंबर रोजी दिवसभरासाठी ४२ जादा बसगाड्या विविध मार्गांवर उपलब्ध राहतील.
विशेष स्मृतिस्थळ दर्शन बस
५ आणि ६ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून ‘डॉ. बाबासाहेब स्मृतिस्थळ दर्शन’साठी १० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या चालणार असून, भाडे प्रति प्रवासी ७५ रुपये असेल.
बसपासची सुविधा
५ आणि ६ डिसेंबरला चैत्यभूमी व उद्यान परिसरात दैनंदिन ७५ रुपयांचा बसपास उपलब्ध असेल.
मोफत आरोग्यसेवा
मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्रतपासणी, ७०० हून अधिक मोफत चष्मेवाटप, तसेच विविध रोगांबाबत जनजागृती कार्यक्रम राबवले जातील. २० सदस्यांचे वैद्यकीय पथक पाच पाळ्यांमध्ये काम करणार आहे.
महापरिनिर्वाणदिनी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने बेस्टच्या या तयारीमुळे अनुयायांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

