बसला विलंब अन्‌ थांब्यावरही थांबेना!

बसला विलंब अन्‌ थांब्यावरही थांबेना!

Published on

बसला विलंब अन्‌ थांब्यावरही थांबेना!

एसटीच्या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या ३०८ तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या बससेवेसंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ आठवडाभरात या हेल्पलाइनवर तब्बल ३०८ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

नोंदवलेल्या तक्रारींतून गंभीर समस्या समोर आल्या आहेत. त्या थेट मंत्र्यांच्या निदर्शनास आल्या असून वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. बस नियोजित थांब्यांवर थांबत नसल्याच्या तक्रारींवरही तातडीने लक्ष केंद्रित केले जात आहे. पासधारकांना प्रवेश नाकारला जातो. यामध्ये लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी तत्काळ हेल्पलाइन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांत कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत.
----
१०० टक्के निराकरण हवे!
तक्रारींच्या १०० टक्के निराकरणावर लक्ष केंद्रित केल्यास हा हेल्पलाइन क्रमांक केवळ तक्रार पेटी न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे विश्वास केंद्र बनेल, असे मत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी व्यक्त केली.
==
एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाइनवर तक्रारींची नोंद न घेता या ३०८ तक्रारींचा आधार घेऊन कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com