महापालिकेच्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट’साठी अत्याधुनिक व्हिडीओ वॉल प्रणाली; ७.५ कोटींची निविदा जाहीर
‘डिझास्टर मॅनेजमेंट’साठी ७.५ कोटींची अत्याधुनिक ‘व्हिडिओ वॉल’ प्रणाली
परळ येथील सीआयडीएम केंद्रात नवी यंत्रणा; आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्याचे मुंबई महापालिकेचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : आपत्ती व्यवस्थापनातील तत्परता आणि तांत्रिक क्षमतांमध्ये मोठी वाढ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाने (डीएमयू) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परळ येथील सीआयडीएम केंद्रात अत्याधुनिक व्हिडिओ वॉल प्रणाली आणि संलग्न उपकरणे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी महापालिकेने तब्बल ७.५ कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे.
शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक जलद, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी ही नवी उभारणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सीआयडीएम केंद्रातून आपत्ती, हवामान बदल, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती तसेच शहरातील विविध घटनांचे केंद्रीकृत निरीक्षण केले जाते. अत्याधुनिक व्हिडिओ वॉल प्रणालीमुळे सीसीटीव्ही फीड, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि आपत्कालीन परिस्थितींना त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
निविदेचे स्वरूप आणि जबाबदारी
महापालिकेने विद्यमान व्हिडिओ वॉल प्रणालीच्या बायबॅकसह नवीन प्रणालीचा पुरवठा, प्रतिष्ठापना, चाचणी आणि कार्यान्वयन करण्याची जबाबदारी या निविदेद्वारे कंत्राटदारावर सोपवली आहे. या प्रकल्पांतर्गत डीएमयू, एमएचओ आणि सीआयडीएम, परळ येथे बसवण्यात येणाऱ्या नवीन प्रणालीची एकूण चार वर्षांची देखभाल आणि कार्यान्वयन जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असेल. विद्यमान डीएलपी प्रणालीचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढील दोन वर्षांची सेवा आणि देखभालही कंत्राटदारावरच असणार आहे.
------------------
आर्थिक तपशील आणि अंतिम मुदत
निविदेचा एकूण अंदाजे खर्च ७,५१,६०,७७९.४८ रुपये इतका असून, इसारा रक्कम १५,०३,२१६ रुपये निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक बोलीदारांना आपल्या बोली ८ डिसेंबरपर्यंत सादर कराव्या लागणार आहेत, तर प्राप्त बोलींचे उघडपत्र ९ डिसेंबर रोजी केले जाणार आहे. या निविदेसंदर्भात महापालिका मुख्यालयातील डीएमयू कार्यालयात बोलीपूर्व बैठक होणार असून इच्छुक ठेकेदारांना आवश्यक माहिती पुरवली जाणार आहे. निविदेसंबंधित सर्व तपशील फक्त महाटेंडर पोर्टलवरच प्रकाशित केले जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच, कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार महापालिकेकडे कायम ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

