इंडिगोचा तिसऱ्या दिवशीही गोंधळ
इंडिगोचा तिसऱ्या दिवशीही गोंधळ
मुंबईतील ११८ विमानसेवांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोला सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. त्याचा देशभरातील विमान कंपन्यांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळूरसह अनेक प्रमुख विमानतळांवर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मुंबईत ११८ विमानसेवांना फटका बसला. इंडिगोने निवेदनात सांगितले की, नेटवर्कमध्ये ‘लक्षणीय व्यत्यय’ निर्माण झाला आहे आणि आम्ही ग्राहकांची माफी मागत आहोत, ऑपरेशन बाबीमुळे हा उशीर झाला आहे.
मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली होती. इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने अचानक संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली. केबिन क्रू आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये वाद झाला आहे. या वादाचा फटका प्रवाशांना बसला. संपामुळे अनेक विमाने रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी इंडिगोची १८०हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आजही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. याप्रकरणी डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे. हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अनेक जण अडकून पडले आहेत. दररोज सुमारे २,३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवणाऱ्या इंडिगो एअर लाइन्सने बुधवारी प्रवाशांची माफी मागितली आणि सांगितले, की शुक्रवारपर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती समोर आली आहे.
...
गुरुवारी रद्द सेवा
येणाऱ्या - ४४
जाणाऱ्या - ७४
एकूण - ११८
...
प्रवाशांची नाराजी
इंडिगोच्या विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ‘इंडिगोसारखी एअर लाइन्स बेजबाबदारपणे वागेल, असा कधीही विचार केला नव्हता. बुधवारी सायंकाळच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या बदलाबाबत गुरुवारी पहाटेपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. विमान कंपनीला प्रवाशांशी काहीही देणेघेणे नाही,’ असे प्रवासी रितू मल्होत्रा म्हणाल्या. ‘मुंबई विमानतळ टर्मिनल-२ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ढिसाळ गर्दी व्यवस्थापन आणि संवादाचा अभाव त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली,’ असे प्रवासी मनोजकुमार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

