राणीबागेत वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी
राणीबागेत वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी
मृत्यूची माहिती लपवल्याचा आरोप; ‘रुद्र’, ‘शक्ती’च्या मृत्यूमुळे प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीबाग) वाघांच्या सलग मृत्यूच्या घटनांवरून उद्यान प्रशासनावर माहिती दडपल्याचा गंभीर आरोप होत आहे. दीड महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या ‘रुद्र’ वाघाबाबतची माहिती वेळेवर जाहीर न केल्याने प्राणीप्रेमींमध्ये नाराजी वाढली आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरला ‘शक्ती’ वाघाचाही मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२० मध्ये वीरा नावाच्या बछड्याचा मृत्यू झाला होता.
रॉयल बेंगॉल टायगर शक्ती नर आणि करिष्मा माधा जोडीला १२ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातून राणीबागेत आणण्यात आले होते. या वेळी त्यांना झालेल्या वीरा नामक बछड्याचा त्याच वेळी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा हा दुसरा बछडा रुद्र याचा मृत्यू २९ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला होता. ही माहिती जवळजवळ दीड महिना जाहीर झाली नव्हती. उद्यान प्रशासनाने मृत्यूची घटना लपवली होती, असा प्राणीप्रेमींचा दावा आहे. वॉचडॉग फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा म्हणाले की, वाघांच्या आरोग्याविषयीची माहिती वेळेवर जाहीर केली जात नाही. याची सखोल चौकशीची आवश्यकता आहे.
----
प्रशासनाचे म्हणणे...
उद्यान प्रशासनाचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, रुद्रला जन्मताच ट्रीपॅनोसोमा इन्फेक्शन होते. त्यामुळे तीन महिन्यांत त्याची दृष्टीही गेली. त्याला आईकडून दूध कमी प्रमाणात मिळत होते. त्याच्यावर उपचार सुरू असूनही तब्येत ढासळली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्याचे नमुने बॉम्बे व्हेटर्नरी आणि वाइल्ड लाइफ रिसर्च सेंटर नागपूर येथे पाठवले. तेथून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची माहिती जाहीर केली नसल्याचे अजब स्पष्टीकरण राणीबाग प्रशासनाने दिले आहे.
-------
शक्तीचा मृत्यू आणि संशय वाढला
रुद्रचा मुद्दा उघड होण्याआधीच १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वडील ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार शक्तीचा मृत्यू न्यूमोनिया आणि श्वसनासंबंधी आजारामुळे झाला. पाच वर्षांत तीन वाघांचा मृत्यू झाल्याने राणीबागेतील प्राणी आरोग्य व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

