पुरुष नसबंदी मोहिमेत मुंबईची पुन्हा निराशाजनक कामगिरी

पुरुष नसबंदी मोहिमेत मुंबईची पुन्हा निराशाजनक कामगिरी

Published on

१५ दिवसांत केवळ २४ पुरुषांची नसबंदी
मोहिमेत मुंबईची पुन्हा निराशाजनक कामगिरी

मुंबई, ता. ६ ः कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढवण्यासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पुरुष नसबंदी पंधरवड्यात मुंबई शहरात यंदाही अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या विशेष मोहिमेत केवळ २४ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

यंदा मोहिमेचे घोषवाक्य ‘स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार’ असे असले, तरी प्रत्यक्षात सहभाग अत्यल्पच राहिला. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा नसबंदीची संख्या किरकोळ वाढली असली तरी ती लोकसंख्या आणि अपेक्षित उद्दिष्टांच्या मानाने अत्यंत कमी असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महिलांवर २२ पट अधिक भार
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर अधिक असल्याचे दिसून येते. तीन वर्षांतील एकूण ३४,८०५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात स्त्रियांची संख्या ३३,३३८ होती. तर पुरुषांच्या केवळ १,४६७ शस्त्रक्रिया झाल्या. या आकडेवारीनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांवर नसबंदीचा भार तब्बल २२ पट अधिक आहे. पुरुषांचा सहभाग वाढवण्यासाठी माहितीपत्रके, भित्तिपत्रके आणि आरोग्य चर्चा करूनही अपेक्षित यश मिळालेले नाही.

प्रोत्साहन भत्ता आणि टीका
शस्त्रक्रियेनंतर शासनाच्या नियमांनुसार पुरुषांना १,४५१ तर महिलांना फक्त २५० (अनुसूचित जाती/जमातीसाठी ६००) इतका मोबदला दिला जातो. मोबदला अधिक असूनही पुरुषांचा सहभाग नगण्य असल्याने, कुटुंब नियोजन साधनांमध्ये (तांबी, अंतरा इंजेक्शन, गोळ्या) वाढ होऊनही महिलांवरच ही जबाबदारी टाकली जात असल्याची टीका आरोग्य क्षेत्रातून पुन्हा एकदा होत आहे.

वर्ष नसबंदी शस्त्रक्रिया (पुरुष)
२०२३ २०
२०२४ १८
२०२५ २४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com