मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घट

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घट

Published on

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घट
२२ ठिकाणी ‘खराब’ श्रेणीतील ‘एक्यूआय’ची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा झपाट्याने घसरल्याचे चित्र सोमवारी (ता. ८) समोर आले आहे. एकूण ३० पैकी २२ मॉनिटरिंग स्टेशनमध्ये एक्यूआय ‘खराब’ श्रेणीत नोंदवला गेला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे एअर क्वालिटी इंडेक्स १३७ वर पोहोचला आहे. घाटकोपरमध्ये १५४ असा दिवसातील सर्वाधिक एक्यूआय नोंदला गेला. चेंबूर (१३४), देवनार (१३४), भायखळा (१३२), अंधेरी-चकाला (११५) आणि मालाड (१२६) या भागांतही प्रदूषणाची स्थिती खराब पातळीवर आहे. बोरिवली पूर्व (११३), मुलुंड (१०३), सायन (१०३), नेव्ही नगर-कुलाबा (११३), खेरवाडी-वांद्रे पूर्व (१३६), विलेपार्ले (१०९) आणि भांडुप (११०) या स्टेशनवरदेखील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे, तर शहरातील काही मोजक्या ठिकाणी स्थितीत थोडी सुधारणा असून, कांदिवली पश्‍चिम येथे एक्यूआय ६७ नोंदला गेला आहे, मात्र तोही ‘मध्यम’ श्रेणीतच आहे. हवेत पीएम २.५ आणि पीएम १० कणांचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनासंबंधी आजार, खोकला, डोळे-नाक जळजळ होण्याची शक्यता अधिक आहे. नागरिकांनी शक्यतो बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सकाळी व्यायाम टाळावा, अशी सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

शहर एक्यूआय
घाटकोपर – १५४
चेंबूर – १३४
देवनार – १३४
भायखळा – १३२
मालाड पश्‍चिम – १२६
शिवडी – १२१
बीकेसी – १३६
वांद्रे पूर्व – १३६
चकाला – ११५
वरळी – ११२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com