७५ वर्षे जुनी जीर्ण जलवाहिनी यशस्वीरित्या बदलली

७५ वर्षे जुनी जीर्ण जलवाहिनी यशस्वीरित्या बदलली

Published on

७५ वर्षे जुनी जीर्ण जलवाहिनी यशस्वीरीत्या बदलली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी ७५ वर्षे जुनी, जीर्ण झालेली २,७५० मिमी व्यासाची जलवाहिनी अखेर यशस्वीरीत्या बदलण्यात आली आहे. महापालिकेने राबवलेल्या या आव्हानात्मक आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल कामामुळे १७ प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे.

ही जलवाहिनी बदलण्याची अत्यावश्यक कामे सोमवारी (ता. ८) सकाळी सुरू करण्यात आली होती. जवळपास २८ तासांच्या अखंड प्रयत्नांनंतर हे काम मंगळवारी (ता. ९) दुपारी २ वाजता पूर्ण झाले. जल अभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आणि युद्धपातळीवर समन्वय साधत ही महत्त्वाची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. जलवाहिनी बदलल्यानंतर आता प्रभावित विभागांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येत आहे. मुंबईतील अनेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन किंवा काही दशकांपूर्वीच्या असल्याने त्या जीर्ण झाल्याचे आढळते. अशा जुन्या पायाभूत सुविधांमुळे पाणीगळती, दूषित पाणीपुरवठा आणि वहनक्षमता कमी होण्याच्या समस्या निर्माण होत होत्या. महापालिका सातत्याने जुन्या जलवाहिन्यांचे आधुनिकीकरण, सुधारणा आणि नवीन मजबूत वाहिन्या अंथरण्याची कामे करत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com