एचएसआरपी नंबर ३१ डिसेंबर पर्यंत बसवा अन्यथा खिशाला कात्री

एचएसआरपी नंबर ३१ डिसेंबर पर्यंत बसवा अन्यथा खिशाला कात्री

Published on

‘उच्च सुरक्षा पाटी’साठी
३१ डिसेंबरपर्यंत मुदत
मुंबईत अद्यापही लाखो वाहने बाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (एचएसआरपी नंबरप्लेट) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वाहनधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने खासगी वेंडर नियुक्त केले आहेत; मात्र अद्याप लाखाे वाहनांवर ही पाटी लागलेली नाही.
३१ डिसेंबरनंतर शासन आदेशाप्रमाणे एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. ही नंबर प्लेट घरबसल्या बुकिंग करता येते. अगदी मोबाईलवरूनही याची प्रक्रिया हाेते. थेट ऑनलाइन प्रक्रिया करून सोयीच्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बुक करता येते. यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी याचे बुकिंग करून ती बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
===
==
काय कारवाई होणार?
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावणे बंधनकारक केले आहे. ३१ डिसेंबरनंतर ही पाटी नसल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे..
=

किती वाहनांकडून पूर्तता?
अंधेरी आरटीओ
नोंदणीकृत वाहने - ५,४८,१३०
नंबर प्लेट लागल्या - १,५४,६७५
शिल्लक वाहने - ३,९३,४५५
---------------
वडाळा आरटीओ
नोंदणीकृत वाहने - ६,३१,२४४
नंबर प्लेट लागल्या - १,७४,७९०
शिल्लक वाहने - ४,५६,४५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com