सायनमध्ये हवा ‘अतिशय वाईट’

सायनमध्ये हवा ‘अतिशय वाईट’

Published on

सायनमध्ये हवा ‘अतिशय वाईट’
निर्देशांक २५१वर; नागरिकांच्या आराेग्यास धाेका
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ११ : मुंबईतील हवेच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून, सायन परिसरातील प्रदूषणाने गुरुवारी (ता. ११) धोक्याची पातळी ओलांडली आहे. सायन येथे एअर क्वालिटी इंडेक्स एक्यूआय २५१ इतका विक्रमी नोंदवला गेला आहे. हा स्तर ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत मोडत असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आजच्या हवा गुणवत्ता मापन स्टेशन्सच्या आकडेवारीनुसार, सायन हे मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित ठिकाण ठरले आहे. इतर प्रमुख भागांची आकडेवारी ‘वाईट’ श्रेणीत असली तरी सायनची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सायनपाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ११४ वाईट, चेंबूर ११६ वाईट, भायखळा १२१ वाईट नोंद झाली आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स २५१ या पातळीवर पोहोचल्याने सायन परिसरातील नागरिकांसाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या श्रेणीतील हवा श्वसनाचे आजार असलेल्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. ​हृदयविकार आणि फुप्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे.​ सर्वसामान्य नागरिकांनाही श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू शकते. ​लहान मुले आणि वृद्धांनी सकाळी व संध्याकाळी घराबाहेरच्या शारीरिक हालचाली पूर्णपणे थांबवाव्यात, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.
----
कारण काय?
​सायन भागात इतक्या माेठ्या प्रमाणात प्रदूषण वाढण्यामागे मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, धूळ किंवा अनियंत्रित वाहतूक यापैकी कोणती कारणे आहेत, याचा शोध महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com