बेकायदेशीर स्कूलव्हॅनविरोधात जानेवारीत विशेष मोहीम
बेकायदा स्कूल व्हॅनविरोधात जानेवारीत विशेष मोहीम
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती
नागपूर, ता. ११ ः महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहिम राबवली जाणार आहे. मुंबईसह राज्यभरात हा उपक्रम १ ते ३१ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे नागपूरमधील २०२१ मध्ये झालेल्या स्कूल व्हॅन अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात मंत्री सरनाईक म्हणाले, की फिटनेस प्रमाणपत्र नसलेली कोणतीही स्कूल बस किंवा व्हॅन रस्त्यावर आढळली तर त्यांना थेट जॅमर लावून बंद केले जाईल. त्याचप्रमाणे आता कुठलीही गाडी फिटनेसशिवाय रस्त्यावर येऊ नये. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून असे वाहन रस्त्यावर येण्यापूर्वीच रोखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या २४८ वाहनांवर कारवाई करून सुमारे ८० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------
स्कूल व्हॅन मॉडेल लागू
महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून १३+१ स्वरूपाची सुरक्षित स्कूल व्हॅन मॉडेल लागू केले आहे. या व्हॅनमध्ये सर्व बाजूंनी जाळ्या बसविण्यात आल्या असून, यात सीसीटीव्ही, जीपीएस अशा सुरक्षितता सुविधा यंत्रणा आहे. त्याचबरोबर अनेक शाळांनी जुन्या बस रद्द करून नव्या सुरक्षित व्हॅन घेण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

