बुलेट ट्रेनच्या २३० मीटर स्टील पूलाची उभारणी
बुलेट ट्रेनच्या २३० मीटर स्टील पुलाची उभारणी
भरूचजवळ १३० मीटर स्पॅनचे यशस्वी लॉन्चिंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील कंथारिया गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग-६४ आणि रेल्वेच्या भरूच-दहेज फ्रेट (मालवाहतूक) मार्गावर उभारण्यात येणाऱ्या २३० मीटर लांबीच्या स्टील पुलाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या पुलाच्या १३० मीटर लांबीच्या स्पॅनचे यशस्वी लॉन्चिंग मंगळवारी (ता. ९) करण्यात आले.
सलग १३० मीटर लांबीच्या स्पॅन स्टील पूल आणि १०० मीटर अशा दोन स्पॅनचा यामध्ये समावेश असून, लॉन्च करण्यात आलेल्या स्पॅनची उंची सुमारे १८ मीटर, रुंदी १४.९ मीटर आणि वजन सुमारे २,७८० मेट्रिक टन आहे. गुजरातमधील भुज येथील कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या या पुलाची रचना १०० वर्षांच्या आयुष्यासाठी करण्यात आली आहे. सुमारे एक लाख २२ हजारांहून अधिक टॉर्क-शियर टाइप हाय स्ट्रेंथ (टीटीएचएस) बोल्ट, सी-५ सिस्टीम पेंटिंग आणि मेटॅलिक बेअरिंगचा वापर या पुलासाठी करण्यात आला आहे. जमिनीपासून १४ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेस्टल्सवर पूल असेंबल करून, मॅक-अलॉय बारसह दोन सेमी-ऑटोमॅटिक जॅकच्या मदतीने हा स्पॅन पुढे ढकलण्यात आला. प्रत्येक जॅकची वहनक्षमता २५० टन इतकी आहे.
१२ तासांत काम पूर्ण
मालवाहतूक (फ्रेट) रेल्वेमार्गावर टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेऊन आणि एनएच-६४ वर वाहतूक वळवून अवघ्या १२ तासांत हे लॉन्चिंग काम पूर्ण करण्यात आले. सुरक्षितता, अचूकता आणि सुरळीत कामकाज यासाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण नियोजन अशा पद्धतीने करण्यात आले होते की, रस्ते वापरकर्ते आणि सुरू असलेल्या फ्रेट वाहतुकीवर अत्यल्प परिणाम होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने पश्चिम भारतातील या महत्त्वाकांक्षी द्रुतगती रेल्वे प्रकल्पाला आणखी गती मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

