सहाय्यता निधीतून 
२९९ कोटींची मदत

सहाय्यता निधीतून २९९ कोटींची मदत

Published on

सहाय्यता निधीतून
२९९ कोटींची मदत

३५ हजार ३६२ रुग्णांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. ६ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटी ४३ लाख ५२ हजार ४०० रुपये वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली आहे.

कक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली. भविष्यात अधिकाधिक रुग्णांना मदत करता यावी, यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्यविषयक सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण आदी उपक्रमांतून गरजू रुग्णांसाठी मदतीचे मार्ग आणखी सुलभ होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या जिल्हा कक्षामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा वेळ आणि पैशांची बचत हाेत आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला एफसीआरए प्रमाणपत्र मिळाल्यामुळे परदेशातून थेट देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. ही परवानगी मिळवणारा भारतातील हा पहिलाच कक्ष ठरला आहे.

आरोग्य योजनांचे एकत्रीकरण
राज्यातील विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सर्व आरोग्यविषयक योजनांचा लाभ एकाच प्रणालीत मिळणार आहे. पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया एकसंध झाल्याने रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

त्रिपक्षीय करार
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कॉर्पोरेट कंपनी, रुग्णालय आणि काही प्रमाणात रुग्णांचे योगदान अपेक्षित असणार आहे. साेपी ऑनलाइन प्रक्रिया, जिल्हा कक्षांची स्थापना आणि इतर नवीन उपक्रमांमुळे हजारो रुग्णांना वेळेवर मदत मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com