कुष्ठरुग्णांना दिलासा
कुष्ठरुग्णांना दिलासा
कुष्ठरोग ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित
रुग्णाचा अहवाल सादर करणे बंधनकारक ः मंत्री आबिटकर
मुंबई, ता. १५ : राज्य सरकारने नुकताच साथरोग अधिनियम अंतर्गत कुष्ठरोग हा ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केला आहे. या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय, खासगी, अशासकीय संस्था, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी निदान झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांचे अहवाल यापुढे सरकारकडे सादर करणे बंधनकारक झाले आहे. यातून राज्यातील नवीन नोंदणी अथवा उपचार घेणाऱ्या सर्व कुष्ठरुग्णांची नोंदणी होण्यास मदत होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
मंत्री आबिटकर यांनी विधान परिषदेत विक्रम काळे, शिवाजीराव गर्जे आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की, वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांत कुष्ठरोग शोध अभियान १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आले आहे. या अभियानात आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे सुमारे ८.६६ कोटी लोकसंख्येची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या तपासणीमध्ये आढळून आलेल्या सर्व संशयितांची वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून निदान निश्चित झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात या तपासणीनंतर सर्व जिल्ह्यांत कुष्ठरोग शोध अभियान, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुसुम मोहीम इ. विविध मोहिमा व अभियान राबवले जात आहे. त्यामार्फत समाजातील सर्व कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणले जात असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
नवीन रुग्ण
राज्यात एप्रिल, २०२५ अखेर १४,१७५ कुष्ठरुग्ण बहुविध औषधोपचाराखाली होते. एप्रिल, २०२५ मध्ये १,२६३ नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून, यामध्ये ३.४० टक्के (४३ मुले) इतके मुलांचे प्रमाण आहे.
मुबलक अधिकारीवर्ग
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सर्वसाधारण आरोग्यसेवेमध्ये एकत्रीकरण झाले असून, राज्यात हा कार्यक्रम राज्य शासन, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या अधिपत्याखालील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता नाही. तसेच, नियमित व विशेष मोहिमेद्वारे कुष्ठरुग्णांच्या लक्षणांच्या आधारे शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणले जात असल्याने सर्व कुष्ठरुग्णांचे निश्चित मोजमाप होत असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

