मध्य रेल्वेच्या स्थानकांत प्रवासी सुविधांमध्ये वाढ

मध्य रेल्वेच्या स्थानकांत प्रवासी सुविधांमध्ये वाढ

Published on

मध्य रेल्वेच्या स्थानकांत प्रवासी सुविधांमध्ये वाढ 

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १५ :  मध्य रेल्वेकडून स्थानकांवरील सुविधांमध्ये सुधारणा करून प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  सर्व प्रवाशांना आरामदायी,  सुलभ आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी हे प्रयत्न आहेत.
मुंबई विभागाकडून प्रवाशांसाठी नोव्हेंबर महिन्यात अनेक सुविधा पुरवण्यात आल्या. एकूण सहा नवीन सरकते जिने उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामध्ये पनवेल स्थानकावर तीन,  नेरळ स्थानकावर दोन आणि बदलापूर स्थानकावर एक सरकता जिना उभारला आहे.  विविध स्थानकांवर एकूण १४८ नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट बीएलडीसी पंखे बसविण्यात आले आहेत. त्यात ऊर्जेचा वापरही सुमारे ५० ते ७० टक्क्यांनी कमी होतो.  दादर स्थानकात दोन नवीन हाय व्हॉल्यूम लो स्पीड एचव्हीएलएस पंखे बसविण्यात आले आहेत. ते पंखे मोठ्या जागेत हळूहळू मोठ्या प्रमाणात हवा फिरवून प्रभावी थंडावा व हवेशीर वातावरण निर्माण करतात,  तसेच कमी ऊर्जेच्या वापरात अधिक आराम व ऊर्जा बचत प्रदान करतात. विविध स्थानकांवर एकूण ३९१ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. हे दिवे अधिक चांगला प्रकाश देतात आणि पर्यावरणपूरक आहेत.  अंबरनाथ स्थानकावर जुने फलक हटवून एकूण १४ नवीन उपनगरीय रेल्वे सूचना फलक बसविण्यात आले आहेत. हे नवीन फलक दिसायला आकर्षक असून त्यांची स्पष्टता अधिक चांगली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ वर एक नवीन वॉटर कुलर बसवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com