सेंट्रल पार्कचा आराखडा सादर

सेंट्रल पार्कचा आराखडा सादर

Published on

सेंट्रल पार्कचा आराखडा सादर

महालक्ष्मी रेसकाेर्सचा वारसा जपण्याची शिंदेंची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडलगतची मोकळी जागा अशा २९५ एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, की सेंट्रल पार्कमध्ये कोणतेही काॅँक्रीटचे बांधकाम होणार नाही. रेसकोर्सचा ऐतिहासिक वारसा जतन करून संपूर्ण परिसर हरित उद्यानाच्या स्वरूपात विकसित केला जाणार आहे.

या सेंट्रल पार्कच्या संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आले. या वेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की या प्रकल्पामुळे ३०० एकरचे ऑक्सिजन पार्क तयार होणार असल्याने मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले. महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२५ एकर आणि कोस्टल रोडची १७० एकर जागा मिळून एकूण २९५ एकरवर हे सेंट्रल पार्क साकारले जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
------
काेस्टल मार्गाला जाेडणार
या प्रकल्पापासून १,२०० मीटर लांबीचा भूमिगत मार्ग कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. यासाठी ५५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मेट्रो ३वरील नेहरू विज्ञान केंद्र स्थानकातूनही भूमिगत मार्गाने सेंट्रल पार्कपर्यंत थेट प्रवेश मिळणार आहे. कोस्टल रोड पार्किंगमध्ये १,२०० गाड्या आणि १०० बस उभ्या राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
----
भूमिगत स्पोर्ट्‌स काॅम्प्लेक्स
सुमारे १० लाख चौरस फुटांचे भूमिगत अत्याधुनिक, पर्यावरणपूरक मल्टी-स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळांसह खो-खो, कबड्डी यांसारख्या देशी खेळांसाठीही येथे सुविधा उपलब्ध असतील. पार्कमध्ये फिरताना मुंबईकरांना अश्वशर्यती पाहण्याचाही अनुभव मिळणार आहे.
----
ठाण्यात ‘व्हिव्हिंग टॉवर’!
- ठाणे खाडीकिनारी ५० एकर क्षेत्रात भारतातील सर्वात उंच असा २६० मीटर उंचीचा व्हिव्हिंग टॉवर उभारला जाणार आहे.
- यासह स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क, अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पक्षी संग्रहालय, म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडणारा १८.४ किमी लांबीचा हरित पट्टा विकसित केला जाणार आहे.
- या प्रकल्पांमुळे मुंबई व ठाण्याचे पर्यावरण सुधारण्यासोबतच नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com