काही धारावीकरांचे तात्पुरते स्थलांतर होणार
धारावीतील काही रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर होणार!
मुंबई, ता. १६ : धारावीकरांसाठी पुनर्विकास हा पर्याय नसून गरज आहे; मात्र धारावीत मोकळी जागा अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे बांधकाम सुरू करण्यासाठी काही रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागणार असल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीपासूनच रहिवाशांना झोपडीतून पुनर्वसनाच्या माध्यमातून उत्तम घरांमध्ये स्थलांतरित करण्याचा आमचा उद्देश आहे. तरीही गणेश नगर-मेघवाडी किंवा रेल्वे जमिनीवरील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर टाळता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धारावीतील सेक्टर १ मधील गणेशनगर-मेघवाडी परिसरातील सुमारे ४२ रहिवाशांना स्थलांतराबाबत नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धारावीतील रहिवाशांना सन्मानपूर्वक त्यांच्या नव्या घरांमध्ये स्थलांतरित करण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच तात्पुरत्या स्थलांतराची गरज असल्याचे स्पष्ट केले. पुनर्वसनाच्या घरांचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही कल्याणकर म्हणाल्याचे डीआरपीने स्पष्ट केले आहे. डॉ. कल्याणकर म्हणाले, ‘या कुटुंबांचे स्थलांतर सुलभ होण्यासाठी आम्ही भाडे सहाय्य, ब्रोकरेज यासह सर्वतोपरी मदत देत आहोत.
...
असे मिळणार भाडे
सध्याच्या व्यवस्थेनुसार तळमजल्यावरील पात्र निवासी रहिवाशांना दरमहा १८ हजार रुपये इतके भाडे देण्यात येत असून, स्थलांतराच्या वेळी १२ महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर दरमहा थेट भाडे.
पहिल्या मजल्यांवरील पात्र निवासी रहिवाशांना दरमहा १५,००० रुपये इतके भाडे देण्यात येत असून, १२ महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर त्यांनाही मासिक भाडे देण्यात येईल.
तळमजल्यावरील व्यावसायिक रहिवाशांना दर चौरस फूट १७५ रुपये इतके मासिक भाडे देण्यात येत असून, १२ महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर दरमहा भाडे दिले जाईल.

