मुंबई
शिवसंग्राम महापालिका निवडणूक लढवणार!
शिवसंग्राम महापालिका
निवडणूक लढवणार!
मुंबई, ता. १६ : विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुका लढवणार असल्याचे शिवसंग्रामने जाहीर केले. शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांची मुंबई, भिवंडी, नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसंग्रामचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते शशिकांत राऊत यांनी दिली आहे.

