विद्यापीठाच्या संशाेधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता
विद्यापीठाच्या संशाेधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता
वैद्यकीय उपकरणाच्या डिझाइनला यूकेमध्ये कायदेशीर संरक्षण
मुंबई, ता. १७ ः मुंबई विद्यापीठाच्या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. मुंबई विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागातील विभागप्रमुख डॉ. श्रीवरंमगई रामानुजम आणि सात सदस्यीय संशोधन चमूने पोर्टेबल ‘आरोग्य निरीक्षण उपकरण’ (हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइस)ची नावीन्यपूर्ण डिझाइन तयार केली आहे. या डिझाइनची युनायटेड किंगडममध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.
आरोग्य निरीक्षण उपकरणाची डिझाइन आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरण वर्ग २४मध्ये समाविष्ट आहे. त्यात वैद्यकीय व प्रयोगशाळा उपकरणांचा समावेश होतो. हे डिझाइन हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइसेस आणि अप्लाइड इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. आरोग्य निरीक्षण प्रणाली, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल हेल्थ उपाययोजना यांद्वारे रुग्ण निरीक्षण, निदान प्रक्रिया व आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
आरोग्यसेवा वितरण प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता या उपकरणात असल्याचे संशोधक डॉ. श्रीवरमंगई रामानुजम यांनी सांगितले. या संशोधनासाठी डॉ. नीलम शर्मा, अभिजित सुधाकर, डॉ. रवी शंकर पांडेय, डॉ. उपेन्द्र कुमार, डॉ. राजीव रंजन राय आणि डॉ. नितीश पाठक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संघभावना व आंतरसंस्थात्मक संशोधन समन्वयाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
----
यासाठी उपकरण उपयुक्त
- हृदयगती, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब यांसारखे आरोग्यविषयक मोजमाप
- रुग्णालये, दवाखाने तसेच घरगुती उपचार व्यवस्थेमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची स्थिती सहजपणे पाहता येणार
- आरोग्यात होणारे बदल त्वरित लक्षात येऊन संभाव्य धोके वेळीच ओळखता येणार
- दूरस्थ उपचार प्रणालीत रुग्णांची माहिती सुरक्षितपणे डॉक्टरांपर्यंत पोहोचवता येणार
- वृद्ध, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण व अतिदक्षता उपचारांदरम्यान उपयुक्त
---------------------
डिझाइन नोंदणीनंतर पुढील टप्प्यात उपकरणाच्या प्रोटोटाइपची पडताळणी, क्लिनिकल किंवा फील्ड चाचण्या, तसेच कार्यात्मक बाबींसाठी पेटंट संरक्षण घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भविष्यात या डिझाइनमध्ये आरोग्य तंत्रज्ञान कंपन्यांना लायसन्स देणे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट व डिझाइन नोंदणी करून संरक्षण विस्तारण्याची शक्यता तपासली जाणार आहे.
- डॉ. श्रीवरमंगई रामानुजम, संशोधक, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

