मुंबईची हवेत लक्षणीय सुधारणा

मुंबईची हवेत लक्षणीय सुधारणा

Published on

मुंबईची हवेत लक्षणीय सुधारणा

डिसेंबरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दिलासा; स्वच्छता अन्‌ प्रदूषणविरोधी माेहिमेचे यश
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १७ : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबरमध्ये मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत (एक्यूआय) मोठी सुधारणा झाली आहे. महापालिकेने राबवलेल्या सखाेल स्वच्छता (डीप क्लीनिंग) आणि प्रदूषण विरोधी मोहिमेचे हे सकारात्मक फळ असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, १ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५८ ते १६७ च्या दरम्यान होता. आरोग्यासाठी ताे चिंताजनक मानला जातो. यंदा १ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा निर्देशांक १०५ ते ११३ या ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला आहे. १ डिसेंबरला हा निर्देशांक १०५ इतका खाली आला होता. गतवर्षी ताे १६७ होता.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. गेल्या १५ दिवसांत ३७६ ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे रस्ते स्वच्छ करण्यात आले असून, २५३ ठिकाणी ‘मिस्टींग मशीन’द्वारे हवेत पाणी फवारून धूलिकण खाली बसवण्याचे काम करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५३ बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा धाडण्यात आल्या, तर १२१ ठिकाणी थेट काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या या उपाययोजनांमुळेच यंदा हिवाळ्यात हवा गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत आहे. नागरिकांनी उघड्यावर कचरा जाळणे टाळावे आणि पालिकेने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पर्यावरण विभागाचे उपआयुक्त अविनाश काटे यांनी केले.
---
सरकारी आकडेवारीच पाहा!
नागरिकांनी हवेच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही खासगी आकडेवारीवर विश्वास न ठेवता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा ‘समीर’ या ॲपलाच प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
............
१ ते १६ डिसेंबरदरम्यानचा निर्देशांक
१ डिसेंबर - १०५ (१६७)
२ डिसेंबर - १२६ (१७४)
३ डिसेंबर - १२८ (१२९)
४ डिसेंबर - १३८ (१३९)
५ डिसेंबर - १२४ (१५४)
६ डिसेंबर - ११६ (१४८)
७ डिसेंबर - ११३ (१२६)
८ डिसेंबर - १२० (१२५)
९ डिसेंबर - ११५ (११२)
१० डिसेंबर - १०१ (१३१)
११ डिसेंबर - १०५ (१३९)
१२ डिसेंबर - ११२ (१३७)
१३ डिसेंबर - ११५ (१२८)
१४ डिसेंबर - १३१ (१३४)
१५ डिसेंबर - १२२ (१५९)
१६ डिसेंबर - ११३ (१५८)
(कंसात गेल्या वर्षीची आकडेवारी)
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com