मुंबई, नागपूरमधील न्यायालयांत बॉम्ब ठेवल्याची अफवा

मुंबई, नागपूरमधील न्यायालयांत बॉम्ब ठेवल्याची अफवा

Published on

मुंबई, नागपूरमधील न्यायालयांत बॉम्ब ठेवल्याची अफवा
इमारती रिकाम्या करून झाडाझडती

मुंबई, ता. १८ ः पुन्हा एकदा ‘न्यायदालने आरडीएक्सने उडवून देऊ’ अशी अफवा ईमेलद्वारे पसरवून अज्ञात व्यक्तींनी मुंबई, नागपूरमधील न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणला. एकाच ईमेल आयडीवरून गुरुवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालय, शहरातील चार दंडाधिकारी न्यायालये, नागपूर सत्र न्यायालय आणि दोन नामांकित बँकांच्या मुंबईतील मुख्यालयांना अफवेचा ईमेल पाठवण्यात आला.
ईमेल प्राप्त होताच यातील बहुतांश इमारती रिकाम्या करून प्रत्येक कानाकोपरा बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथकांनी तपासला; मात्र एकाही इमारतीतून संशयास्पद वस्तू, स्फोटके आदी काहीही आढळले नाही. ही चाचणी पूर्ण होताच हा ईमेल अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले आणि कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद करण्यात आल्याचे पोलिस उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
उच्च न्यायालयासह किला, माझगाव, अंधेरी आणि वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या अधिकृत ईमेल खात्यावर सहा न्यायालये, न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आरडीएक्स-आयईडी स्फोट होतील, दुपारी २ वाजेपर्यंत न्यायालये रिकामी करा, असा ईमेल गुरुवारी १० वाजता प्राप्त झाला. विशेष म्हणजे, प्रत्येक ईमेल एकाच आयडीवरून पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात हे ईमेल इस्राइल देशातून पाठविण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. हे खाते बोगस असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
...
अडीच तास तपास
संबंधित न्यायालयांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ईमेलबाबत माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तडक उच्च न्यायालयासह अन्य दंडाधिकारी न्यायालयाच्या इमारती गाठून त्या रिकामी करून घेतल्या. न्यायालय आवारात उभी वाहने, वकील आणि अशिलांची गर्दी पोलिसांनी दूर केली. साधारण दोन ते अडीच तास उच्च न्यायालयात तपासणी केल्यावर पोलिसांनी ही अफवा असल्याचे जाहीर केले.
...
याआधीच्या अफवा
- १२ सप्टेंबरला दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बची अफवा होती. तेव्हा उच्च न्यायालयाची इमारत रिकामी करून झाडाझडती घेण्यात आली होती. त्यात न्यायालयीन कामकाजाचे सुमारे तीन तास वाया गेले होते.
- १९ सप्टेंबरला आठवड्याच्या अंतराने पुन्हा उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट होईल, अशी अफवा पसरवणारा ईमेल प्राप्त झाला. या वेळेस मात्र न्यायालयीन कामकाज सुरू होण्याआधीच पोलिसांनी संपूर्ण इमारतीची झाडाझडती घेऊन ती अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.
- ९ ऑक्टोबरला वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटुंबिक न्यायालयास धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. ती अफवाच ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com