महायुतीचे १५० जागांवर एकमत
महायुतीचे १५० जागांवर एकमत
नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीला नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने आपला मास्टर प्लॅन तयार केला असून, जागावाटपाचा पहिला मोठा टप्पा पार पडला आहे. मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी १५० जागांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात पूर्ण एकमत झाले असून, उर्वरित ७७ जागांचा निर्णय आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. दादर येथील भाजप कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीच्या वज्रमुठीचे दर्शन घडवले. ‘धनुष्यबाण आणि कमळ यामध्ये कोणताही फरक नाही, आम्ही एकच आहोत. जागावाटप किंवा इतर कोणत्याही कारणाने ही युती तुटणार नाही,’’ असा ठाम विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे आणि १५०पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवणे, हाच आमचा एकमेव निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीतील सर्वात मोठा राजकीय निर्णय म्हणजे नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घेतलेली भूमिका होय. ‘‘नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीशी आमचे काहीही देणेघेणे नाही. जोपर्यंत ते आरोपांतून निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही,’’ असे अमित साटम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. यामुळे महायुतीत केवळ भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) हेच प्रमुख घटक असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.
...
मतभेद असल्यास..
उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करताना म्हटले की, गेली २५ वर्षे मुंबई लुटणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ही युती घट्ट आहे. आम्ही केवळ जागा लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. उर्वरित ७७ जागांवर दोन-तीन दिवसांत चर्चा पूर्ण होईल आणि जिथे मतभेद असतील, तिथे राज्याचे सर्वोच्च नेते तोडगा काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला निवडणूक प्रभारी आशीष शेलार, प्रवीण दरेकर, खासदार मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वे, योगेश कदम आणि शीतल म्हात्रे आदी नेते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

