सतर्क महिलांमुळे घरफोडे अटकेत
सतर्क महिलांमुळे घरफोडे अटकेत
चेंबूर येथील दोन स्वतंत्र घटना
मुंबई, ता. २० ः चेंबूर येथे दोन सतर्क महिलांनी स्वतंत्र घटनांमध्ये घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरट्यांना पकडून दिले. चेंबूर आणि चुनाभट्टी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या चोरट्यांना अटक केली.
पहिली घटना १७ डिसेंबरच्या रात्री चेंबूरच्या सिंधी सोसायटीत घडली. या सोसायटीतील चंदेरी निवास या दुमजली इमारतीत मध्यरात्री चोर शिरला. तळमजल्यावर राहणाऱ्या रिटा कार (६०) यांना रात्री साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या उकळ्या गॅलरीच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने गेल्या तेव्हा त्यांनी एक व्यक्ती पाण्याच्या पाइपच्या सहाय्याने वर चढून दुसऱ्या मजल्यावरील बंद घरात दार तोडून शिरल्याचे पाहिले.
त्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षास संपर्क साधून घटना सांगितली. त्यानुसार चुनाभट्टी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घरात शिरलेल्या चोराला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव अर्जुनप्रसाद माजी असे सांगितले. त्याने या घरात चोरीच्या उद्देशाने शिरल्याची कबुलीही दिली. घराची झाडाझडती घेतली असता दाराचा कडीकोयंडा उचकटण्यासाठी आवश्यक साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याबद्दल अर्जुनप्रसाद याला अटक केली.
दुसरी घटना चेंबूरच्या आर. सी. मार्ग परिसरातील कोकणनगर परिसरात घडली. भाजी विक्री करणाऱ्या विमला यादव आपल्या मुलीच्या घरी काही दिवसांसाठी वास्तव्यास आहेत. १८ डिसेंबरच्या पहाटे चारच्या सुमारास घरी कोणीतरी शिरल्याचा भास त्यांना झाला. त्यांनी उठून लाइट सुरू केली असता एक व्यक्ती लगबगीने त्यांच्या घरातून बाहेर पडण्याच्या बेतात असल्याचे त्यांनी पाहिले. घाई करून त्यांनी या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचे केस विमला यांच्या हाती आले. त्यांनी या व्यक्तीला पकडून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी जागे झाले. त्यांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. दिनेश शिवगण (२५) असे या व्यक्तीने ओळख सांगितली. पोलिसांनी त्याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

