मुंबईची हवा असमाधानकारक
मुंबईची हवा असमाधानकारक
डिसेंबरमध्ये एक्यूआय १००च्या वर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईच्या हवेची गुणवत्ता डिसेंबरमध्ये बहुतेकदा असमाधानकारक राहिली. साधारणपणे एक्यूआय १००च्या वर होता. आकडेवारीवरून असे दिसून येते, की २५ पैकी फक्त दोन दिवस १००च्या खाली एक्यूआय नोंदवला गेला. आज मुंबईचा एक्यूआय ११४ नोंदला गेला.
हिवाळा सुरू होताच मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावते. या वेळी ७ नोव्हेंबरपासून ही घसरण सुरू झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायुप्रदूषण देखरेख ॲप ‘समीर’च्या अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्यात ३० पैकी फक्त सहा दिवस हवेची गुणवत्ता चांगली होती. उर्वरित दिवसांमध्ये एक्यूआय १००च्या वर होता. या महिन्यातील १५ दिवसांमध्ये, एक्यूआय १५० ते १९८पर्यंत होता. दरम्यान, नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमधील हवेची गुणवत्ता थोडी चांगली होती. एकाही दिवशी एक्यूआय १५०पेक्षा जास्त नव्हता. या महिन्यातील २१ तारखेला ९१ एक्यूआय आणि २४ तारखेला ८६ नोंदवला गेला. जो सर्वांत कमी होता. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या प्रदूषणाबद्दल पालिकेला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला आहे. न्यायालयाने पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कडक शब्दांत फटकारले आहे. गेल्या काही दिवसांत पालिकेने अनेकदा कारवाई केली आहे, ज्यात बेकायदा भट्ट्या आणि प्रदूषण करणाऱ्या आरएमसी प्लांटविरुद्ध एमपीसीबीची कारवाई यांचा समावेश आहे. दरम्यान, बदललेल्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. सध्या सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी, डोकेदुखी वाढली आहे. जवळपास ५० ते ६० टक्के नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

