३६.५५ कोटींचे हेरॉईन जप्त
३६.५५ कोटींचे हेरॉइन जप्त
तीन महिलांसह नऊ अटकेत; पायधुनी पोलिसांची कारवाई
मुंबई, ता. २६ : थर्टीफर्स्टच्या निमित्ताने अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत पायधुनी पोलिसांनी ३६ काेटी ५५ लाखांचे हेरॉइन जप्त केले. १६ ते २४ डिसेंबरदरम्यान सुरू असलेल्या कारवाईत पायधुनी पोलिसांनी तीन महिलांसह नऊ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ किलो हेरॉइन, कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१६ डिसेंबरच्या पहाटे मशीद बंदर परिसरात संशयास्पद वावरणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीकडे कौशल्यपूर्ण चौकशीत अमली पदार्थविक्रीत गुंतलेली पुढील आठ जणांची साखळी उद्ध्वस्त करण्यात आली, असे पोलिस उपआयुक्त विजयकांत सागर यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ निरीक्षक विनोद गावकर, निरीक्षक अभिजित शिंदे (गुन्हे), निरीक्षक सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लहामगे, अनिल वायाळ आणि पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे १६ डिसेंबरच्या पहाटे पी. डिमेलो मार्गावरून जलाराम ठक्कर (वय ३७) आणि वसीम मजरूद्दीन सय्यद (२७) यांना अटक केली. दोघांकडून सुमारे एक काेटी ३० लाखांचे ३२६.२२ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले. दोघांच्या चौकशीतून रुबिना मोहम्मद सय्यद खान (३०), मुस्कान समरूल शेख (१९), मेहरबान अली, अब्दुल कादिर शेख यांना अटक केली.
त्यांच्या चौकशीतून पोलिस पथकाला ओशिवरा येथील आनंदनगरातील एका घराचा पत्ता मिळाला. तेथे छापा घातला असता नवाजीस गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी आणि समद गालीब खान हे तिघे हेरॉइनच्या पुड्या बांधताना आढळले. या ठिकाणाहून तब्बल ३३ कोटी ८६ लाख रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

