(मुंबई टुडे)हवामान आणि पर्यावरणीय बदलावर मुंबईतील निर्मल निकेतनमध्ये अंतरराष्ट्रीय परिषद,

(मुंबई टुडे)हवामान आणि पर्यावरणीय बदलावर मुंबईतील निर्मल निकेतनमध्ये अंतरराष्ट्रीय परिषद,

Published on

हवामान बदलावर विचारमंथन
निर्मला निकेतन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : हवामान आणि पर्यावरणीय बदल, देशातील नागरिकांचे आरोग्य, सर्वसामान्य नागरिकांच्या उपजीविकेपासून ते शाश्वत उपजीविका यासह मानव आणि पर्यावरण यांच्यातील बदलत्या नातेसंबंधांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन करण्यासाठी कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन (स्वायत्त) संस्थेत दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १६ आणि १७ जानेवारी २०२६ला मुंबईत होणार असल्याची माहिती कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतनच्या प्राचार्या डॉ. आशा मॅथ्यू यांनी दिली.
परिषदेचा केंद्रबिंदू हा ‘जीवनमान उन्नती : भूतकाळाचा प्रतिसाद, शाश्वत व सक्षम भविष्यासाठीचे दृष्टिकोन’ हा असून, जगभरातील अनेक तज्ज्ञ, मान्यवर विविध विषयांवर आपली भूमिका आणि मत व्यक्त करतील. तसेच त्यांच्याकडून आपले संशोधन लेखही या परिषदेत सादर केले जाणार आहेत. परिषदेत भारतासमोर सध्या निर्माण झालेल्या अत्यावश्यक विकासात्मक प्रश्नांवर या परिषदेत चर्चासत्र, समूह चर्चा इत्यादी होणार असून, यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, संशोधक, स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थी आपले मत व्यक्त करतील.
परिषेदेत देशातील विविध विषयांवरील व्याख्याने, विविध विषयांवरील चर्चासत्रे, संशोधनपत्र आणि पोस्टर सादरीकरणे, पॅनेल चर्चा, कौशल्य विकास कार्यशाळा तसेच युवक समुदाय संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेमुळे संशोधनआधारित धोरणात्मक शिफारशी, आयएसबीएन प्रमाणित संपादित पुस्तक, सर्वोत्तम प्रथांचा डिजिटल संग्रह आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहयोग वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास प्राचार्या डॉ. आशा मॅथ्यू यांनी व्यक्त केला.


सामाजिक विकासाशी नाळ

कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन हे महाविद्यालय अनेक दशकांपासून शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य, पोषण, पर्यावरण जतन, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाशी संबंधित विविध उपक्रम राबवत आले आहे. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठीचे कार्य तसेच सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासाबद्दलची संस्थेची कटिबद्धता, यामुळे ही परिषद जागतिक स्तरावरील विचारविनिमयासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचेही डॉ. मॅथ्यू म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com