वचननाम्यात ‘हिंदुत्व’, ‘मराठी माणूस’ कुठे?
वचननाम्यात हिंदुत्व, मराठी माणूस कुठे?
राहुल शेवाळे यांची ठाकरे-मनसे युतीवर टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘शिवशक्ती’ वचननाम्यावर शिवसेना शिंदे गटाने जोरदार पलटवार केला आहे. या वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदू आणि हिंदुत्व हे शब्द जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहेत. हा जाहीरनामा म्हणजे ‘बॉम्बे स्कॉटिश’ शाळेचा प्रभाव असलेल्या इंग्रजी शब्दांचा भडीमार आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
राहुल शेवाळे यांनी ठाकरेंच्या ‘शब्द ठाकरेंचा’ या घोषवाक्यावर आक्षेप घेतला. स्वतःला हिंदुहृदयसम्राटांचे वारस म्हणवणाऱ्यांनी एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी चक्क ‘हिंदुहृदयसम्राट’ हा शब्दच वचननाम्यातून हद्दपार केला. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचा हा अपमान वेदनादायी आहे. या वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो असला तरी त्यात त्यांचा विचार आणि आत्मा नाही, असे ते म्हणाले.
----
जुनीच आश्वासने ‘कॉपी-पेस्ट’
२०१७च्या निवडणुकीत दिलेली आश्वासनेच पुन्हा या वचननाम्यात ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा टोला शेवाळे यांनी लगावला. ‘समुद्राचे पाणी गोड करणे, गारगाई पिंजाळ धरण, कोळीवाड्यांचे प्रश्न ही आश्वासने २०१७मध्येही दिली होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना हे प्रश्न का सोडवले नाहीत? आजचा हा वचननामा म्हणजे केवळ बालकांना (राजकीय अस्तित्व) वाचवण्यासाठी पालकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
---
‘पंचवार्षिक’ कार्यक्रम लवकरच
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना शिंदे गट आपला विशेष पंचवार्षिक कार्यक्रम घोषित करणार आहे. त्यात मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांचे पुनर्वसन, मराठी उद्योजक आणि महिलांसाठी ठोस निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

