बहुतांश प्रभागांत बोगस मतदान?

बहुतांश प्रभागांत बोगस मतदान?

Published on

बहुतांश प्रभागांत बोगस मतदान?

मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांवर मतदारांचा आरोप

मुंबई, ता. १५ : शहरातील बहुतांश प्रभागांतून बोगस मतदानाच्या घटना समोर आल्या आहेत. मतदानासाठी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाची ओळख तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांनी हाताशी धरून मोठ्या प्रमाणात बोगस मतदान घडवून आणल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.

भांडुपमधील उत्कर्षनगर येथील दुबई चाळीत राहणाऱ्या आरती भोसले (वय ६४) गुरुवारी सकाळी यशवंत चांदजी शाळेतील केंद्रावर मतदानासाठी आल्या; मात्र त्या केंद्रावर पोहाेचण्याआधीच त्यांच्या नावे भलत्याच महिलेने मतदान केल्याचे केंद्रावरील नोंदीनुसार उघड झाले. केंद्र अधिकाऱ्यांनी खातरजमा करून भोसले यांना मतपत्रिका दिली. त्यावर त्यांनी मतदान केले.

आईने मतदान केले, पण तिच्या नावे झालेले बोगस मतदानही गणले जाईल, असे केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रात शिरताच प्रथम मतदान यादीत नाव आहे का, ते तपासले जाते. त्यानंतर छायाचित्र पडताळण्यासाठी आधार आदी ओळखपत्रावरून अधिकारी खातरजमा करतात. इतकी व्यवस्था असताना भलतीच व्यक्ती मतदान कशी करू शकते, असा सवाल आरती यांचा मुलगा अमित याने उपस्थित केला.

आरती वृद्ध असल्याने मतदानाला येणार नाहीत, असे वाटल्याने त्यांचे नाव बोगस मतदानासाठी निवडले असावे, असा अंदाजही अमित यांनी व्यक्त केला. त्यांच्या दाव्यानुसार संबंधित केंद्रात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले. अशीच परिस्थिती विक्रोळीतील टागोरनगर येथे उद्‌भवली. टागोरनगर येथील रहिवासी राजेश शुक्ला हे येथील श्री सिद्धिविनयगर इंग्लिश हायस्कूलमध्ये मतदानासाठी पोहाेचले; मात्र त्यांच्या नावावर आधीच मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रभागातील उमेदवारांनी केंद्र अधिकाऱ्यांना जाब विचारताच शुक्ला यांना मतपत्रिका देण्यात आली.

उमेदवारांत शाब्दिक बाचाबाची
भांडुप येथील टेंभीपाडा परिसरातील आदर्श शाळेत प्रभाग क्रमांक ११४ येथील मतदान प्रक्रिया सुरू होती. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या केंद्रावर कब्जा करून मतदारांवर प्रभाव पाडल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवार सुप्रिया धुरत यांनी केला. या प्रभागातून ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल रिंगणात आहेत. राजुल यांचे कार्यकर्ते केंद्रात उपस्थित असल्याचे समजताच धुरत आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोहाेचल्या. त्यामुळे सुमारे तासभर आदर्श शाळेतील केंद्राबाहेर तणावपूर्ण वातावरण होते. या केंद्राबाहेर उपस्थित दोन उमेदवारांत शाब्दिक बाचाबाची झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच पोलिस आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com