घाटकोपर येथील आगीत तीन जण होरपळले
घाटकोपर येथील आगीत तीन जण होरपळले
एकाची प्रकृती चिंताजनक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : घाटकोपर (पश्चिम) भागातील नारायणनगर येथील एका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आज सकाळी १०.२२च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन कामगार होरपळले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
नारायणनगरमधील महेंद्र हॉस्पिटलजवळ असलेल्या युनियन बँक बिल्डिंगमध्ये ही आग लागली. ही इमारत तळमजला अधिक दोन मजल्यांची इंडस्ट्रियल इस्टेट आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गाळा क्रमांक २०९मध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.४२ वाजता या आगीला लेव्हल एक घोषित करण्यात आले. सुमारे १,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली ही आग गाळ्यातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, फॅन, इस्त्री, स्टीमर, लाकडी फर्निचर, शिलाई मशीन, तयार कपडे, स्टीलचे रॅक आणि ऑफिस फाईलपर्यंत मर्यादित होती. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी १ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या घटनेत तिघे जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील रियाजुद्दीन (वय ३०) हे ६० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हद्दीस अली (५१) हे ३० टक्के भाजले असून प्रकृती स्थिर आहे. वलायत अली (५०) हे तीन टक्के भाजले असून प्रकृती स्थिर आहे. या तिन्ही जखमींनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे, असे महापालिकेने कळवले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

