महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, राज्य सरकारच्या योजनेतून कोटी रुपयांचे मोफत निदान, दर दिवशी ४५ हजार लोकांना होत आहे फायदा
महालॅब्सचा रुग्णांना फायदा
७.६ कोटींहून अधिक लोकांची मोफत तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महाराष्ट्रातील राष्ट्रीय मोफत प्रयोगशाळा निदान सेवा कार्यक्रम ‘महालॅब्स’ हा देशातील सर्वाधिक यशस्वी मोफत निदान कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने एचएलएल लाइफकेअर लिमिटेडद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून आतापर्यंत ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना मोफत प्रयोगशाळांतून तपासणी करण्याचा लाभ मिळाला असून, दररोज सरासरी ४५ हजारांहून अधिक नागरिकांना या सेवांचा फायदा होत आहे.
राज्यातील ३,५०० पेक्षा अधिक सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक तपासण्यांपासून ते प्रगत व विशेष तपासण्यांपर्यंत सर्व सेवा पूर्णतः मोफत दिल्या जात आहेत. यामुळे वेळेवर निदान व उपचार शक्य होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. महालॅब्स अंतर्गत हिस्टोपॅथॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी (आरटी-पीसीआर), मायक्रोबायोलॉजी, एचबी इलेक्ट्रोफोरेसिस तसेच नवजात बालकांची तपासणी (न्यूबॉर्न स्क्रीनिंग) अशा विशेष तपासण्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, नवजात तपासणी, व्हायरल लोड चाचण्या व हेमॅटोलॉजीमध्ये महालॅब्स प्रयोगशाळा देशात आघाडीवर आहेत.
२०१७ मध्ये पुण्यात एका प्रयोगशाळेपासून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर १३७ प्रयोगशाळांपर्यंत विस्तारला आहे. खारघर, नागपूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी व गडचिरोली येथील सात प्रयोगशाळांना एनएबीएल मान्यता, तर खारघर येथील प्रयोगशाळेला कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट्सची मान्यता मिळाली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम, व्हायरल हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम आणि जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम यांचा समावेश महालॅब्समध्ये करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, बारकोड व डिजिटल प्रणालीद्वारे नमुना संकलन, तपासणी व अहवाल वितरण केले जाते. एसएमएस, व्हॉट्सॲप, ई-मेल व डॉक्टर पोर्टल्सद्वारे अहवाल उपलब्ध करून दिले जात असून, राज्यभर अचूक, वेळेवर आणि मोफत निदान सेवा देण्याचे उद्दिष्ट महालॅब्स साध्य करत आहे.
फोटो - 984
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

