हेल्मेट, सीटबेल्ट अंमलबजावणीसाठी रडार आणि एआयचा वापर
अपघाती मृत्यूंमध्ये घट
एआयच्या वापराचा परिणाम; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आकडेवारीत घसरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : रस्ता सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील अपघाती मृत्यूंमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. परिवहन विभागाने हेल्मेट आणि सीट बेल्टच्या अंमलबजावणीसाठी रडार आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, याचा थेट परिणाम दिसून येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर २०२४मध्ये ७४ अपघातांत ९० मृत्यू झाले होते. २०२५मध्ये त्यात घट होऊन ६० अपघातांत ६८ जणांनी आपला जीव गमावला आहे. या मार्गावर वर्षभरात १४ अपघात आणि २२ मृत्यूंची घट झाली आहे.
२०२४च्या तुलनेत २०२५मध्ये राज्यात अपघातांची संख्या जरी वाढली असली तरी मृतांची संख्या एका टक्क्याने घटली आहे. राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्यूंची आकडेवारी पाहता, २०२४मध्ये ३६ हजार ११८ अपघातांत १५ हजार ७१५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत गतवर्षी म्हणजेच २०२५मध्ये अपघातांची संख्या ३६ हजार ४५० एवढी झाली असली तरी मृतांची संख्या १५ हजार ५४९ पर्यंत खाली आली आहे.
परिवहन विभागाच्या उपाययोजनांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली आहे. रस्ते अपघात आणि मृत्यूंमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०३०पर्यंत यात ५० टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने ठेवले आहे.
अमरावती शहरामध्ये वर्षभरात अपघातांत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. नागपूर जिल्ह्यात अपघातांचा आकडा २२ टक्क्यांनी खाली आला आहे.
पालघर जिल्ह्यात २१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. अमरावती ग्रामीणमध्ये अपघाताचा आकडा १५ टक्क्यांनी कमी झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये अपघातांच्या संख्येत १३ टक्के आणि धुळे जिल्ह्यात ११ टक्क्यांनी घट झाली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आकडेवारी
कालावधी अपघात मृत्यू
जानेवारी ते डिसेंबर २०२४ - ७४ - ९०
जानेवारी ते डिसेंबर २०२५- ६० - ६८
वर्षभरातील घट - १४ - २२
परिवहन विभागाच्या प्रमुख सुरक्षा उपाययोजना
- राज्य आणि जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्षांची निर्मिती
- प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रस्ता सुरक्षा आराखडा
- रडार-इंटरसेप्टर वाहनांसाठी ३३२ पथकांची नियुक्ती
- वर्षभरात ५३ शासकीय आणि १३ खासगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू
- राज्यभर ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर आयटीएमएस वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी
फोटो - 777
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

