

जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर परिसरात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली उच्च दर्जाची सफरचंदे आता नवी मुंबईतील बाजारात दाखल झाली आहेत. या आरोग्यदायी फळांमुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सेंद्रिय सफरचंदांचा हंगाम जानेवारी ते जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील सहा महिने सफरचंद खवय्यांसाठी पर्वणी
असणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारात एका गाडीमध्ये एक हजार खोके काश्मिरी सफरचंद येत असून १० ते १५ किलो माल एका खोक्यात असतो. या खोक्यांमध्ये वर्गवारीनुसार ५० ते १२० नग असतात. सध्या या सफरचंदाच्या आकार आणि दर्जानुसार घाऊक बाजारात १५० ते १९० रुपये प्रतिकिलो दराने, तर किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये विक्री होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.