मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Published on

भारंगममध्ये ‘बिलिमारो’चा डंका
मुंबई विद्यापीठाच्या नाटकाची देशपातळीवर निवड

मुंबई, ता. ११ : मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद इनामदार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बिलिमारो’ या नाटकाचा प्रयोग ४ फेब्रुवारी रोजी रांची, झारखंड येथे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या ‘भारंगम’ (भारतीय रंग महोत्सव)मध्ये करण्यात आला. विशेष म्हणजे बिलिमारो या दशावतार व वास्तववादी शैलीतील नाटकाची देशभरातील सुमारे एक हजार नाटकातून निवड झाली आहे. नाटकाच्या उत्कृष्ट आणि दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उभ राहून टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले.
‘बिलिमारो’ या नाटकातील मध्यवर्ती भूमिका (बिलिमारो) अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचा विद्यार्थी श्लोक पोहनकर याने साकारली आहे. ‘बिलिमारो’ याचे मूळ मराठीत लेखन तेजस मस्के यांनी केले असून हिंदी रूपांतर आणि दिग्दर्शन डॉ. मिलिंद इनामदार यांनी केले आहे. डॉ. इनामदार हे मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागात गेले २१ वर्ष अभिनय, दिग्दर्शन, नाट्य निर्मिती आणि आवाज व संवाद बोलण्याची क्रिया याचे प्रशिक्षण देतात. तसेच विद्यार्थ्यासाठी आजवर त्यांनी आठ महत्त्वाची नाटके दिग्दर्शीत केली आहेत. यामध्ये खेळ, अजिंठा, ऐन वसंतात अर्ध्या रात्री, हमीदाबाईची कोठी, अंधा युग, अभी रात बाकी है, महाभोज आणि राखीव सवल्यांचा खेळ अशा उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश आहे. आजवर डॉ. मिलिंद इनामदार यांनी ६० हून अधिक कार्यशाळा आणि ४० हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. बिलिमारो नाटकाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहेच त्याबरोबरच युवा अभिनेत्यांना आत्मविश्वास देण्याचे काम सुद्धा केले आहे.
-------------------
संघर्ष मांडणारे ‘बिलिमारो’
दशावतार लोककलापरंपरेतील स्त्रीवेषातील पुरुष पात्राच्या माध्यमातून ओळख आणि स्वप्नांचा संघर्ष उलगडणारे ‘बिलिमारो’ हे नाटक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. साडी नेसून, हातात थाळी घेऊन प्रेक्षकांत उतरणारे बिलिमारो ही व्यक्तिरेखा नाटकाला वेगळं परिमाण देते. स्त्री भूमिका करणारे, नावाजलेले वडील आणि राजा-राक्षस होण्याचे स्वप्न पाहणारा संवेदनशील मुलगा शांती यांच्यातील संघर्ष यात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. ब्रह्मराक्षसची भूमिका मिळाल्यावर शांती काय निर्णय घेतो, यावर नाटकाची उत्कंठा आधारलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com