

करण जोहरविरोधात
मजकूर टाकण्यास मज्जाव
मुंबई, ता. १० : दिग्दर्शक करण जोहरविरोधात बदनामीकारक, अश्लील आणि अपमानास्पद मजकूर समाजमाध्यमांवर टाकण्यास प्रसिद्ध यूट्युबर कॅरी मिनाटी उर्फ अजय नागरला सत्र न्यायालयाने मज्जाव केला. तसेच समाजमाध्यमांवरील जोहर यांना लक्ष्य करणारे सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचेही अंतरिम आदेश दिले. जोहर यांनी याविरोधात कनिष्ठ न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर नुकतीच दिवाणी न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.
समाजमाध्यमांवरील व्हिडिओमध्ये आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा जोहरच्या वतीने करण्यात आला. समाजमाध्यमांवरील सर्व व्हिडिओ अथवा मजकूर आधीच हटवल्यामुळे कारवाईचे कारणच शिल्लक नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान, सर्व बाजू ऐकल्यानंतर नागर आणि अन्य प्रतिवादींनी बदनामीकारक भाषा वापरल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले आणि त्यास आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास मनाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.