धनगर बांधवासाठी लढाई सुरुच ठेवणार ः खा.वडकुते

धनगर बांधवासाठी लढाई सुरुच ठेवणार ः खा.वडकुते
Published on

धनगर बांधवांसाठी लढाई सुरूच ठेवणार ः खा. वडकुते
मुंबई, ता. ११ ः आता तर मला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे धनगर बांधवाच्या न्याय-हक्कांसाठी माझी लढाई सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी दिले. राज्यसभेत निवड झाल्याबद्दल इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्यातर्फे मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांचा सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
अत्यंत कष्टातून उच्चशिक्षण घेऊन आणि संघर्ष करून मी इथपर्यंत कसे आलो, त्याची आठवण खासदार वडकुते यांनी करून दिली. नोकरीतून समाजकारणाकडे आणि त्यानंतर राजकारणाकडे वळलो. धनगर समाजाच्या न्याय-हक्काची लढाई लढताना देशाचे नेते शरद पवार यांचे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे लक्ष गेले. घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी थेट विधान परिषदेवर नियुक्ती केली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कित्येकदा विधान परिषदेचे सभागृह बंद पाडल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे सदस्यत्व शिल्लक असताना भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पुढची नऊ वर्षे माझ्याकडे राजकीय पद नव्हते. अनेकांना वाटले मी राजकीयदृष्ट्या संपलो आहे; मात्र मी माझे काम सुरूच ठेवले. एवढी मोठी संधी दिल्‍याबद्दल त्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या वेळी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cross-Voting Concerns Trigger BJP Strategy Ahead of Crucial MLC Election
solapur vidhan parishad election
Yavatmal
Ramrao Vadkute Credits BJP for Welfare Schemes for Dhangar Community in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com